Homeताज्या बातम्या

नागरिकांना दिलासा; वाहतुकीस अडथळा ठरणारी कचराकुंडी हटवलीवाहतूक शाखेच्या तत्पर कारवाईमुळे बार्शी रोडवरील कोंडी कमी

बीड शहरातील बार्शी रोड हा सध्या वाहतूक कोंडीचा प्रमुख केंद्रबिंदू बनला असून, सुरू असलेली रस्त्याची कामे आणि परिसरातील मंगल कार्यालयांमुळे या मार्

कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू;पाण्यासाठीच वापर ; २५ ठिकाणी पाणी सोडले
आ. काळेंच्या पुढाकारातून ‘महाराजस्व’ला गती : शिंदे
रात्री डीजेवर बंदी; राहुरी पोलिसांची कठोर भूमिका 


बीड शहरातील बार्शी रोड हा सध्या वाहतूक कोंडीचा प्रमुख केंद्रबिंदू बनला असून, सुरू असलेली रस्त्याची कामे आणि परिसरातील मंगल कार्यालयांमुळे या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर एका नामांकित हॉटेलसमोर रस्त्यालगत ठेवण्यात आलेली कचराकुंडीही वाहतुकीस अडथळा ठरत असल्याची बाब समोर आली होती. रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या या कचराकुंडीमुळे वाहनचालकांना मार्ग काढताना अडचणी येत होत्या. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावत होता आणि कोंडीची समस्या अधिक गंभीर बनत होती. या समस्येची गंभीर दखल घेत जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह तातडीने कारवाई केली. संबंधित कचराकुंडी तेथून हटवून सुरक्षित अंतरावर स्थलांतरित करण्यात आली. या कारवाईमुळे रस्त्यावरील अडथळा दूर झाला असून वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी ओळखून त्वरित उपाययोजना करणार्‍या वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे शहरवासीयांकडून स्वागत होत आहे. तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी घेतलेल्या या सकारात्मक पुढाकाराबद्दल प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि त्यांच्या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

COMMENTS