Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्ह्यात मोतिबिंदुच्या 23506 शस्त्रक्रिया

लातूर प्रतिनिधी - राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लातूर जिल्ह्यात मोतिबिंदूच्या 23 हजार

जळगाव जिल्ह्यातील जवानाला वीरमरण
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत दोन मुलींना शोधण्यात यश
जागृती शुगरच्या संचालकपदी बालाजी बिराजदार यांची निवड

लातूर प्रतिनिधी – राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत लातूर जिल्ह्यात मोतिबिंदूच्या 23 हजार 506 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हे काम 138.92 टक्के पुर्ण झाले. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यासाठी 16 हजार 957 मोतिबिंदु शस्त्रक्रियेचे वार्षिक उद्दिष्ट्ये देण्यात आले होते. परंतू, लातूर जिल्ह्याने 23 हजार 506 मोतिबिंदू शस्त्रक्रिया करुन 138.92 टक्के काम पूर्ण केले आहे.
हे उद्दिष्ट्ये पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या स्व. विलासराव देशमुख शायकीय महाविद्यालय लातूर, सामान्य रुग्णालय उदगीर, उपजिल्हा रुग्णालय निलंगा व ग्रामीण रुग्णालय अहमदपूर या संस्थांनी सहभाग नोंदविला तसेच अशासकीय स्वंयसेवी रुग्णालये, खाजगी रुग्णालये यांनीसुद्धा हे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. जिल्हाधिकारी लातूर हे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या कामगिरीबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी नेत्रशल्यचिकित्सक डॉ. सुधीर पाठक व त्यांच्या सर्व टिमचे अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS