Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समोस्यात आढळला चक्क गुटखा अन् कंडोम

दगडही निघाले, पुण्यातील ऑटोमोबाइल फर्मच्या कँटीनमधील प्रकार

पुणे ः पुण्यातील एका ऑटोमोबाइल फर्मच्या कँटीनमधील समोस्यात गुटखा, निरोध व दगड आढळल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा

मोटार-वाहन अपघात दाव्यातील फसवणूक करणार्‍यांवर कारवाई
मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू; सर्व मृतदेहांची ओळख पटली
तालुक्यासह जिल्हा राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू 

पुणे ः पुण्यातील एका ऑटोमोबाइल फर्मच्या कँटीनमधील समोस्यात गुटखा, निरोध व दगड आढळल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असता कंपनीने कंत्राट रद्द केल्याच्या रागातून हा प्रकार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील एका ऑटोमोबाइल फर्मच्या कंपनीच्या कँटीनमध्ये गत 27 मार्च रोजी हा प्रकार घडला.
शनिवारी ऑटो फर्मच्या काही कर्मचार्‍यांनी आपल्या समोस्यात निरोध, गुटखा व दगड मिळाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा कसून तपास करण्यात आला. त्यात हे प्रकरण कंत्राट रद्द केल्याच्या संतापातून झाल्याचे निष्पन्न झाले. कंत्राट रद्द झालेल्या कंपनीच्या 2 कर्मचार्‍यांनी नव्या ठेकेदाराला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केला होता. पोलिसांनी सदर 2 पैकी एका कर्मचार्‍याला अटक केली आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. इतर आरोपीची चौकशी सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. फिरोज शेख उर्फ मंटू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रहीम शेख, अजहर शेखर, मजहर शेख, विकी शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅटालिस्ट सर्व्हिस सोल्यूशन्स पार्टनर्स प्रा. लि. कंपनीचे सहायक महाव्यवस्थापक कीर्तिककर शंकरराव देसाई यांनी या प्रकरणी चिखली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. देसाई यांची कंपनी पूर्वी मोरवाडी येथील मे. एसआरएस एंटरप्रायझेस कंपनीला समोसा पुरवण्याचे कंत्राट दिले होते. पण समोस्यात प्रथमोपचार पट्टी आढळल्यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर हे कंत्राट मे. मनोहर एंटरप्रायझेस या नव्या कंपनीला देण्यात आले. त्यामुळे नव्या कंपनीला बदनाम करण्यासाठी मे. एसआरएस एंटरप्रायझेस कंपनीच्या मालकांनी असा प्रकार केला. या प्रकरणी त्यांचे अन्न पदार्थ पुरवण्याचे कंत्राट रद्द व्हावे या हेतूने कंत्राट रद्द झालेल्या कंपनीचे मालक रहीम शेख, अजहर शेख व मजहर शेख यांनी त्यांचे कामगार फिरोज व विकी यांना नवे कंत्राट मिळालेल्या मनोहर एंटरप्रायझेस येथील कारखान्यात कामासाठी पाठवले. त्यानंतर आरोपी रहीम, अजहर व मजहरच्या निर्देशांनुसार या दोघांनी समोसा तयार करताना त्यात निरोध, दगड व गुटखा मिसळला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

COMMENTS