Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मावळ लोकसभेसाठी फेर मतदान व्हावे : श्रीरंग बारणे यांची मागणी

रायगड / प्रतिनिधी : मावळ लोकसभा मतदार संघातील रायगड जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाल्याने कर्जत तालुक्यात मोठी हानी झाली. झाडे पडली आहेत

अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्याचे वीजग्राहकांना आवाहन
मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
नायगावमधील ‘त्या’ ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा; अन्यथा लातूर कृषी सहसंचालक कार्यालयासमोर जनआंदोलनाचा इशारा

रायगड / प्रतिनिधी : मावळ लोकसभा मतदार संघातील रायगड जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाल्याने कर्जत तालुक्यात मोठी हानी झाली. झाडे पडली आहेत. घरावरील पत्रे उडून गेली आहेत. वीज खंडित झाल्याने मतदान केंद्रावरील मतदान दोन-तीन तासांपेक्षा अधिक काळ खोळंबळे आहे. त्या तालुक्यात मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा किंवा फेर मतदान घ्यावे, अशी मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. तसा पत्रव्यवहार राज्य आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांना केला असल्याचे बारणे यांनी सांगितले आहे.

श्रीरंग बारणे म्हणाले, सकाळपासून झालेले मतदान बघता जवळपास 55 टक्केपर्यंत मतदान जाईल असा अंदाज आहे. मतदारांनी मोठ्या उत्साहात देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केले. त्या मतदारांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. मावळ लोकसभा मतदार संघामधील रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला. कर्जत तालुक्यामध्ये वीज खंडित झाली. अनेक ठिकाणी झाडे पडली. मी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे देखील मागणी केली आहे. विजेअभावी ज्या मतदान केंद्रांवर दोन-तीन तास मतदान होऊ शकले नाही. तिथे वेळ वाढवून देण्यात यावा. अन्यथा फेर मतदान घ्यावे, अशी मागणी श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

COMMENTS