आम्ही काम करतो, फोटोबाजी नाही ; आ. जगताप यांचा विरोधकांना सूचक टोला, आयुर्वेदला नवीन आयडीयु सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आम्ही काम करतो, फोटोबाजी नाही ; आ. जगताप यांचा विरोधकांना सूचक टोला, आयुर्वेदला नवीन आयडीयु सुरू

आपण केलेल्या कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्‍वास संपादन केलेला आहे. नगर शहरात कधीही केलेल्या कामाची फोटोबाजी होत नाही, पण प्रत्यक्षात काम करून दाखविले जाते, असा सूचक टोला आ. संग्राम जगताप यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.

मंगल दत्त क्षेत्रात आत्मिक समाधान मिळते- आ अरुण काका जगताप 
Ahnedmagar : नगरकरांनो कोरोनाची लस न घेणाऱ्यांना रेशनही मिळणार नाही | LokNews24
पुस्तकांच्या विश्वात मुले रमली

अहमदनगर/प्रतिनिधी- आपण केलेल्या कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्‍वास संपादन केलेला आहे. नगर शहरात कधीही केलेल्या कामाची फोटोबाजी होत नाही, पण प्रत्यक्षात काम करून दाखविले जाते, असा सूचक टोला आ. संग्राम जगताप यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला. कोरोनाच्या संकटकाळामध्ये आरोग्य यंत्रणा कमी पडत असताना या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जीव वाचविणे व मानसिक आधार देण्याचे काम केले आहे व कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे, असे आवाहनही त्यांनी आवर्जून केले. 

     येथील गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद कॉलेज येथे जय आनंद फाउंडेशनच्या विशेष सहयोगातून व मनपा संचलित ऑक्सिजन सुविधा असलेले नवीन आयसीयु विभागाचे उदघाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी आ. जगताप बोलत होते. महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उद्योजक नरेंद्र बाफना, राजेश कटारिया, नगरसेवक विपुल शेटीया, नगर मर्चंटस वँकेचे संचालक कमलेश भंडारी यांच्यासह रितेश पारख, डॉ. पियुष मराठे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, सीए किरण भंडारी, संदेश कटारिया, अशोक गुगळे, पोपट भंडारी, वसंत बोरा, मयुर शेटीया, निलेश गुगळे, विशाल झंवर, वैभव गुगळे, शाम भुतडा, अनुद सोनीमंडलेचा, गौरव बोरा, वैभव मेहेर, महावीर बोरा, गौतम गुथा आदी उपस्थित होते.

    आ. जगताप म्हणाले, गेल्या 1 वर्षापासून मानवी जीवनावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले आहे. या कोवीडच्या संकट काळामध्ये नगर शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, मनपा प्रशासन यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. वर्षभरापासून शहरातील डॉक्टर्स, आरोग्य सेवक, मनपाची आरोग्य यंत्रणा, कोवीड सेंटर चालविणार्‍या खासगी व्यक्ती, संस्था यांनी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली व अनेकांचे प्राण वाचविले. काही दुर्दैवी घटना सोडता नगर शहरातील नागरिकांनी कोरोनाला आत्मविश्‍वासाने पराभूत केले, असा दावा करून ते म्हणाले, नगरकर शासनाचे निर्बंध पाळत असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होत आहे. संशोधकांच्या भाकीतानुसार देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून या काळात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी ऑक्सिजन सुविधा असलेले आयसीयू सेंटर सुरू केले आहे. लवकरच या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लान्ट सुरू होणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. उद्योजक फिरोदिया म्हणाले की, आ. जगताप यांनी कोरोनाच्या संकट काळामध्ये आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे. एक वर्षापासून आरोग्य सेवेत पुढे राहून कोरोना रुग्णांना मदतीचा हात देण्याचे काम केले आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. या लाटेमध्ये तज्ञांच्या सूचनेनुसार लहान मुलांवर परिणाम होणार आहे. तरी प्रत्येकाने मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. एकजुटीने मुकाबला करून कोरोनाची लढाई आत्मविश्‍वासाने जिंकायची आहे. सर्वांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढे यावे, असे ते म्हणाले.

महापौरांचीही सूचक टीका

यावेळी बोलताना महापौर वाकळे यांनीही विरोधकांवर सूचक टीका केली. ते म्हणाले की, कोरोना संकट काळामध्ये मनपाने मानवता हाच धर्म समजून वर्षभर मोठे काम केले आहे. काहीजण मनपाला नावे ठेवण्याचे काम करतात. त्यांनी नावे ठेवून निगेटिव्ह बोलण्यापेक्षा चांगल्या कामाकडे पाहावे. आम्ही चांगले काम उभे केले आहे. या वेदना देणार्‍या काळामध्ये प्रत्येकाने आपली भूमिका पार पाडावी. मनपाने कधीही दुजाभाव न करता जिल्हयातील कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला. बुथ हॉस्पिटलमधील सर्व कोरोना रुग्णांचे बील मनपाने 1 कोटी 90 लाख रुपये दिले, असे ते म्हणाले.

COMMENTS