Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपअभियंता नंदकुमार पाटील क्रीम पोस्टच्या शोधात; 130 कोटींच्या भ्रष्टाचार; बदली होऊनही पाच महिन्यानंतर पद सोडेना

मुंबई : सार्वजनिक बांधकाम मध्य मुंबईतील भायखळा उपविभागातील उपअभियंता नंदकुमार पाटील यांची तब्बल साडेचार-पाच महिन्यांपूर्वी बदली होऊनही ते आपले पद

गुड न्यूज! महाराष्ट्रात आता दरवर्षी वीज बिल कमी होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना
कार्यकारी अभियंता दिघावकर यांचा 99 कोटींचा अपहार; राष्ट्रीय महामार्ग मंडळ चेंबूरमध्ये भ्रष्टाचाराचा सुळसुळाट

मुंबई : सार्वजनिक बांधकाम मध्य मुंबईतील भायखळा उपविभागातील उपअभियंता नंदकुमार पाटील यांची तब्बल साडेचार-पाच महिन्यांपूर्वी बदली होऊनही ते आपले पद सोडण्याच्या तयारीत नाही. या उपविभागात 130 कोटींचा भ्रष्टाचार करून पुन्हा एकदा क्रीम पोस्टच्या शोधात नंदकुमार पाटील असून वरळी उपविभाग क्रमांक -1 किंवा उत्तर उपविभाग दादर येथे बदली करून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दैनिक लोकमंथनला खात्रीलायक सूत्रांनी समजले.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक -2 चे उपअभियंता नंदकुमार पाटील यांची 29 ऑक्टोबर 2025 रोजी शासन आदेश क्रमांक एलटीएस -2025/प्र.125सेवा/-2 या आदेशानुसार त्यांची मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम विभाग) कोकण उपविभाग येथे बदली करण्यात आलेली आहे. असे असतांना देखील तब्बल पाच महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असतांना देखील आपला कार्यभार स्वीकारलेला नाही. याउलट या उपविभागात भ्रष्टाचाराच्या पायर्‍या चढत कोट्यावधींचा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे. याप्रकरणात वरिष्ठांकडे तक्रारी दाखल असतांनाही नंदकुमार पाटील याच पदावर कसा कार्यतर आहे, हा गंभीर प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तब्बल पाच महिन्यानंतर बदली झालेल्या कोकण उपविभागात जाण्याऐवजी उपअभियंता नंदकुमार पाटील मुंबईत सूत्र हलवत दादर किंवा वरळी उपविभागात क्रीम पोस्टसाठी प्रयत्न करत असल्याचे समजते. तब्बल 130 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणार्‍या आणि विविध तक्रारी असणार्‍या अधिकार्‍याला पुन्हा मुंबईतील एक उपविभाग देणे म्हणजे पुन्हा नव्याने भ्रष्टाचाराला संधी देण्यासारखाच हा गंभीर प्रकार आहे. उपअभियंता नंदकुमार पाटील मार्चअखेरीस मध्य मुंबईतील भायखळा उपविभागातील पद सोडण्याची शक्यता नाही. मात्र त्यापूर्वीच क्रीम पोस्टवर आपली बदली करून घेण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.


दैनिक लोकमंथन करणार राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार
बदलीचा शासकीय आदेश असतांना देखील आपल्या मूळ पदावर कायम राहून तब्बल 130 कोटींचा भ्रष्टाचार आणि शासन निर्णयाची अवहेलना केल्याप्रकरणात त्यांच्यावर शिस्तभंगाची आणि अपहारप्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दैनिक लोकमंथन आज राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे करणार आहोत. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आर्थिक गुुन्हे शाखा यांच्याकडे तक्रारी करून याप्रकरणी गुन्हे नोंदवून चौकशी करण्याची मागणी करणार आहोत.


प्रलंबित देयकांची व्हावी चौकशी
उपअभियंता नंदकुमार पाटील यांनी प्रलंबित बिलांवर लक्ष ठेवून काढलेल्या बिलांचा हिशोब घेता येईल असा उद्देश दिसून येत आहे. याप्रकररणसात कोट्यावधी रूपयांची अ‍ॅडजेस्टमेंटची बोगस देयके काढण्यासाठी त्यांचा अट्टाहास सुरू असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणात त्यांनी गेल्या चार वर्षांत घेतलेल्या निर्णयांची आणि काढलेल्या देयकांची चौकशी होण्याची गरज आहे.


नंदकुमार पाटलांची कॅ. अशोक खरातसारखीच कार्यपद्धत
राज्यात नाशिकचे तथाकथित कॅप्टन अशोक खरातचे कारनामे चांगलेच गाजतांना दिसून येत आहे. त्याने अनेक उच्च कुटुंबांतील महिलांचे लैंगिक शोषण केले. तसेच त्याची कार्यपद्धती ठरलेली होती. त्याचप्रकारे सार्वजनिक बांधकाम भायखळा उपविभागातील उपअभियंता नंदकुमार पाटलांची कार्यपद्धत ठरलेली असून त्यांच्यासोबत असलेला गोतावळा बघता राज्यात पुन्हा एखादे नवे प्रकरण समोर आले तर नवल वाटायला नको.

COMMENTS