Homeताज्या बातम्या

शिक्षण विभागात ’दहशतशाही’चा आरोप; शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार

नांदेड: नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या कथित मनमानी कारभार, उद्धट वागणूक आणि कर्मचाऱ्यांकडून

वारी-कान्हेगाव पुलाची उभारणी ही विकासाची पायाभरणी : आ. काळे
दिल्लीतील आंदोलनाला अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) पाठिंबा; तहसीलदारांना दिले निवेदन
दिव्यांगांच्या सहाय्यक साधन वितरणासाठी अहिल्यानगरमध्ये आढावा बैठक; खासदार निलेश लंके यांचे नियोजनाचे निर्देश

नांदेड: नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्या कथित मनमानी कारभार, उद्धट वागणूक आणि कर्मचाऱ्यांकडून कथित ’हप्ता वसुली’च्या आरोपांमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आधीच एका शिक्षकाने दोन मुलांसह आत्महत्या केल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या शिक्षण विभागात आता अंतर्गत असंतोष उघडपणे समोर आला असून, कर्मचाऱ्यांनी थेट विभागीय उपायुक्तांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्यावर गंभीर आरोप करत, गेल्या दीड वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा सातत्याने मानसिक छळ होत असल्याचा दावा केला आहे. कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरणे, अपमानास्पद वागणूक देणे, कार्यालयीन वातावरणात दडपशाही निर्माण करणे, तसेच टेबलवरील बेल फेकून मारण्यासारखे प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, काही कर्मचाऱ्यांकडून दरमहा १० ते १५ हजार रुपयांची कथित वसुली होत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या तक्रारींमध्ये काही धक्कादायक घटनांचाही उल्लेख आहे. कर्मचारी गज्जेवार यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांच्या वडिलांचा अस्थिकलश महिनाभर घरातच ठेवावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अधीक्षक जाधव यांच्या आईच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांत कामावर रुजू होण्याचे आदेश देऊन निलंबनाची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या कथित त्रासाला कंटाळून उपशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे आणि अधीक्षक जाधव यांनी शासनाकडे बदलीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी विभागीय उपायुक्त दादाराव वानखेडे यांच्या नांदेड दौऱ्यादरम्यान कर्मचारी संघटनेने त्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. कर्मचारी युनियनने स्पष्ट इशारा दिला आहे की, ५ ऑगस्टपर्यंत या प्रकरणात ठोस प्रशासकीय कारवाई झाली नाही, तर जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच, कर्मचाऱ्यांच्या मानसिक छळामुळे भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

COMMENTS