Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोकर तालुक्यात अवैध सागवान तोडीचा धुमाकूळ; संगनमताच्या संशयाने खळबळ

भोकर : भोकर तालुक्यात सागवान (टिक) या मौल्यवान वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कोणतीही शासकीय परवानग

महिलांचा छळ करणारे ‘लांडगे’ ठेचलेच पाहिजे : चित्रा वाघ
मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना, शिवीगाळप्रकरणी सदावर्ते आक्रमक पोलिसांत तक्रार दाखल
मार्च 2026 अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरण पत्र; ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन

भोकर : भोकर तालुक्यात सागवान (टिक) या मौल्यवान वृक्षांची अवैध तोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कोणतीही शासकीय परवानगी न घेता खुलेआम सागवानाची कटाई होत असून, संबंधित अधिकार्‍यांच्या संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोकर तालुका जंगल परिसर म्हणून ओळखला जात असताना येथे सोन्याच्या किमतीएवढे मूल्य असलेले सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. या मौल्यवान संपत्तीवर डोळा ठेवून काही तस्करांकडून अवैधरित्या वृक्षतोड केली जात आहे. विशेषतः किन्नी सर्कलमधील सोमठाणा परिसरात अलीकडेच मोठ्या प्रमाणात सागवान तोड झाल्याचे समोर आले आहे. या तोडीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील इतर भागातही अशाच प्रकारे अवैध तोड सुरू असल्याची चर्चा असून, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना वनविभागाचे नियंत्रण आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, काही अधिकारी, सागवान तस्कर आणि आरा मशीन चालक यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार सुरू राहणे अशक्य आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, भोकर वनविभागात पूर्वी वनपाल म्हणून कार्यरत असलेले अंगद खठाणे, सध्या पदोन्नतीवर रेंजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीकडे नागरिकांचा विश्वास असून, या गंभीर प्रकरणात ते काय कारवाई करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

भोकर तालुक्यातील अवैध सागवान तोडीच्या प्रकरणासंदर्भात वनविभागाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून संबंधित प्रकरण मालकी क्षेत्रातील असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करून दंड वसूल केला जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे.  संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले की, सदर घटना मालकी क्षेत्रातील असून आवश्यक ती तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाईल. नियमांनुसार दंड आकारणी करून महसूल वसूल करण्यात येईल. या प्रकरणामुळे परिसरात चर्चा सुरू असून वनविभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-अंगद खटाने ,
वनपरिक्षेत्र अधिकारी, भोकर.

COMMENTS