Homeताज्या बातम्या

जिल्हा परिषदच्या खडकेवाके शाळेत नवागतांचे स्वागत

राहाता : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडकेवाके येथे नवागत विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शैक्षण

धुनकवाड-2 ची सुपुत्री अंजली विश्वनाथ भोसले हिचे घवघवीत यश
उद्या कोपरगावात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
हर्ष मेहता दहावीच्या सीबीएससी पॅटर्न मध्ये यश

राहाता : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडकेवाके येथे नवागत विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
केंद्रीय गुणवत्ता चाचणीत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खडकेवाके येथील तेजल राजू मुरादे हिने ९७ टक्के गुण मिळविल्याबद्दल तिचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, लेखण्या, शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
वीरभद्र दूध संकलन केंद्राचे अध्यक्ष सुरेश लावरे, शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष कैलास मुरादे तसेच जनसेवा परिवर्तन मंडळाचे संदीप लावरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
‘मिशन आरंभ’ परीक्षेत शाळेला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल शिक्षिका प्रीती नरवडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक कुदळ, शिक्षक सदगीर आणि शाळेच्या विकासासाठी सातत्याने योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांचाही जनसेवा परिवर्तन मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक कुदळ यांनी केले.

COMMENTS