Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सोमैया महाविद्यालयाच्या 259 विद्यार्थ्यांना नोकऱ्या

कोपरगाव : स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात  कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये 259  विद्यार्थ्यांची निवड झाली  अशी माहिती प्राचार्य प्रोफेसर डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.  डॉ. ठाणगे पुढे म्हणाले की, “कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये एकूण 18 कंपन्यांनी महाविद्यालयात येऊन बुद्धिमत्ता चाचणी आणि  प्रत्यक्ष मुलाखती द्वारे या विद्यार्थ्यांची निवड केली. यामध्ये प्रामुख्याने ॲक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, इनोवा सोर्स, जीनियस हार्टेक लिमिटेड,  आर्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पूनावाला फिनकॉर्व, टीव्हीएस ट्रेनिंग अँड सर्विसेस, टाटा मोटर्स लिमिटेड, क्वेस कॉर्प, झिटेक सर्व्हिसेस, क्रॉनिक डिजिटल, स्वाारुद्र सोल्युशन, महालक्ष्मी मारुती सुझुकी नेक्सा शोरूम, रुरल शोर, श्रीराम फायनान्स, कोटक बँक लिमिटेड, ॲक्सिस बँक, टेक्नो ग्रुप सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी कंपन्यानी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह साठी महाविद्यालयास भेट दिली. या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हसच्या आयोजनामध्ये ट्रेनिंग ऑफिसर प्रा.नेहा गुरावे व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विजय सोमासे यांच्यासह प्रा.डॉ. संजय अरगडे, प्रा.सचिन जाधव, प्रा.प्रवीण गुडघे, प्रा.विशाल जगधने, प्रा. ओमप्रकाश धनवटे, प्रा. निवृत्ती माळी, प्रा.डॉ. वसुदेव साळुंके, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे यांच्यासह सर्व विभागातील प्राध्यापकांनी सहभाग घेतला.कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ऍड. संजीव कुलकर्णी व सदस्य संदीप रोहमारे यांनी  अभिनंदन केले.

गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ  
‘संत ज्ञानेश्वर’चा दहावीचा १०० टक्के निकाल
कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी

COMMENTS