Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जगाला गौतम बुद्धांच्या विचारांची गरज : चेअरमन विवेक कोल्हे

जेऊर कुंभारी : आज जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना त्याचा परिणाम सर्वच घटकांवर दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थान

के.बी.रोहमारे महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल
पीकविमा नुकसानभरपाई दिल्याबद्दल शासनाचे आभार : आ. विवेक कोल्हे
कंटेनरची तीन घरांना धडक; माणिकदौण्डी परिसरातील घटना ; जीवितहानी नाही

जेऊर कुंभारी : आज जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना त्याचा परिणाम सर्वच घटकांवर दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने तथागत बुद्धांचे विचार जगाला देण्याची गरज आहे असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक   कोल्हे यांनी केले.
भीमसाम्राज्य सेना जेऊर कुंभारी यांच्या वतीने आयोजित भीम जयंती उत्सवामध्ये मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की आज जयंतीदिनी युवक वर्ग मोठ्या उत्साहाने मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहे ही बाब देखील महत्त्वाची आहे, भीम साम्राज्य सेनेच्या वतीने दरवर्षी विचारांची देवाणघेवाण करून भंतेजी व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने होणाऱ्या ज्ञानदानातून प्रबोधनाचे कार्य केले जाते. हा भीम साम्राज्य सेनेचा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे.
अध्यक्षस्थानी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे  डिव्हिजनल मॅनेजर भिमराज वक्ते  हे होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आरपीआयचे राज्यसचिव दीपक गायकवाड यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. भंते आनंद सुमनसिरीजी व भंते कश्यपजी यांच्या  हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे, बाळासाहेब वक्ते, रमेश घोडेराव,  मधुकरराव वक्ते, माजी व्हा.चेअरमन राजेंद्र गिरमे आदींनी मनोगत व्यक्त केले.
भिमराज वक्ते यांनी युवकांनी बाबासाहेबांचा शिका,संघटित व्हा आणि संघर्ष  करा हा उपदेश समजून घेऊन त्याच्या आचरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी स्मारक समितीचे बाबुराव काकडे,गौतम बँकेचे संचालक बापूसाहेब वक्ते, पोलिस पाटील बाबासाहेब गायकवाड,  माजी उपसरपंच जालिंदर चव्हाण, किशोर गायकवाड,कल्याणराव गुरसळ, महेंद्र  वक्ते, सुरेश पगारे,कोंडीराम वक्ते यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.  

COMMENTS