Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुस्तकांच्या विश्वात मुले रमली

वाई बाजार येथे संयुक्त जयंती निमित्त संमोहनाचा समाज प्रबोधन पर कार्यक्रम
नांदेड-नागपूर 361 राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोड झाल्यामुळे सावली हरपली
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी जुने शहर भागाची केली पाहणी
 

अहमदनगर : सोशल मिडियाच्या ‘स्कोरलिंग’ जगात बोटे मोबाईलवर सराईतपणे फिरणारी बोटे ाज चक्क पुस्तकांच्या पानावरुन फिरत होती. औचित्य होते, जागतिक पुस्तक दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा वाचनालय व रोटरी क्लब -2 ऑफ एम्पॉयरिंग युथच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे.
     जिल्हा वाचनालयातच्यावतीने आयोजित या कार्यक्रमप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महान लेखक विल्यम शेक्सपियर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ‘माणुसकीची शाळा’ चळवळीचे प्रणेते शिवाजी नाईकवाडी, अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, रोटरीच्या समन्वयक डॉ.बिंदू शिरसाठ, खजिनदार तन्वीर खान, संचालिका प्रा.मेधा काळे, प्रा.ज्योती कुलकर्णी, कवी चंद्रकांत पालवे, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल, पल्लवी कुक्कडवाल, वाचक अविनाश रसाळ, संतोष जाधव उपस्थित होते.
     प्रास्तविकात प्रा.शिरिष मोडक यांनी बोलतांना वाचनालयाने वाचन संस्कृतीतून असंख्य पिढ्या घडविल्या आहेत. आज वाचन दिनी बालकांच्या हाती आलेली पुस्तके व संस्कार हा वारसा पुढे चालवतील असा आशावाद व्यक्त केला.
     शिवाजी नाईकवाडी यांनी मुलांशी मनोरंजकपणे सुसंवाद साधतांना वाचन व संस्कार हे आयुष्याला कसे घडवितात, यावर भाष्य केले. यावेळी सुमारे 120 मुलांना विविधध विषयीवरचे बालसाहित्य भेट देण्यात आले.
     विल्यम शेक्सपिअर यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन याप्रसंगी भरविण्यात आले. पुस्तकदिनाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी -2 क्लब एम्पॉयर क्लबच्या अध्यक्ष शिलु मक्कर, सचिव आरती म्हात्रे, सुशिला मोडक, जागृती ओबेरॉय, डॉ.बिंदू शिरसाठ, वाचनालयाचे कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. आभार प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी मानले.

COMMENTS