Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एक मूठ धान्य अनाथांसाठी’ उपक्रम कौतुकास्पद : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

श्रीगोंदा :  स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून अग्निपंख फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेला ‘एक मूठ धान्य अनाथांसाठी’ हा उपक्रम अत्यंत स

महात्मा बसवेश्‍वर यांची ’अक्षय’ विचारधारा सर्वात प्रभावी : डॉ. उपाध्ये
महात्मा बसवेश्वर समाज परिवर्तनाचे महान विचारवंत : सरडे
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : घोगरे; आ.संजय गायकवाड, धिरेंद्र शास्त्री यांचा तीव्र निषेध

श्रीगोंदा :  स्व. अजित पवार यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून अग्निपंख फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेला ‘एक मूठ धान्य अनाथांसाठी’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून तो दरवर्षी सातत्याने राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले. ते श्रीगोंदा येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते.

अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी ‘एक मूठ धान्य अनाथांसाठी’ या उपक्रमात सहभागी झालेल्या ७२ शाळांचा कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब वाघ होते. यावेळी सहभागी सर्व शाळांना उपयुक्त भेटवस्तू देण्यात आल्या, तर विशेष कामगिरी करणाऱ्या १० शाळांना सन्मानपत्र व १० सायकलींचे वितरण करण्यात आले.

आपल्या भाषणात आनंद भंडारी म्हणाले की, मुलांमध्ये दातृत्वाची भावना निर्माण करणे आणि वंचित घटकांना आधार देणे ही काळाची गरज आहे. अशा प्रकारचे उपक्रम शाळांमध्ये राबविल्यास विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढीस लागेल. 

प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी शिक्षणासोबत अशा उपक्रमांची जोड आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा संदर्भ देत ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा उभारण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी उद्योजक संजयकुमार मचे, प्रविण शिंदे, रामदास झेंडे, डी. डी. भुजबळ, विकास पाटील, आबासाहेब जगताप आदींनीही आपले विचार मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्निपंख फाउंडेशनचे विश्वस्त दिलीपराव काटे यांनी केले. यावेळी तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे, गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी, संदीप सोमवंशी, किसन वऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार इथापे यांनी मानले.

COMMENTS