Homeताज्या बातम्या

मुंबईसह पुण्यातही पावसाची दमदार हजेरी

मुंबई : राज्यातील नागरिकांना आणि शेतकर्‍यांना प्रतीक्षेत ठेवणार्‍या मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली असून मुंबईसह उपनगरांमध्ये रविवारी सकाळपासून

१० जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 
श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान


मुंबई : राज्यातील नागरिकांना आणि शेतकर्‍यांना प्रतीक्षेत ठेवणार्‍या मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली असून मुंबईसह उपनगरांमध्ये रविवारी सकाळपासून पावसाने दमदार आगमन केले आहे. अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर झालेल्या या पावसामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दक्षिण मुंबई, पश्‍चिम व पूर्व उपनगरे तसेच आसपासच्या भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पुणे शहरात रविवार दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे शहरातील हडपसर, सिंहगड रोड, कात्रज, कोंढवा, कोथरूड या सर्वच भागांमध्ये आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. गेले काही दिवस पुण्यामध्ये चांगलाच उखाडा जाणवत होता, आता जोरदार पाऊस सुरू असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. विशेष म्ह गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा वेग मंदावला होता. मात्र हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आता मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामानाची सद्यस्थिती मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. मुंबई, ठाणे आणि परिसरात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. निचांकी भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञांनीही मुंबई आणि पुणे परिसरात पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. विविध हवामान नमुन्यांमध्येही पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहण्याबरोबरच 23 ते 25 जूनदरम्यान मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या आशा आता आगामी पावसावर खिळल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात मात्र मान्सूनची दिरंगाई गंभीर ठरत आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने शेतीसमोरील संकट अधिक गडद झाले आहे. जून महिन्याच्या अखेरीसही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामाची चिंता वाढली आहे. अनेक भागांत पेरण्या रखडल्या असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत मोठी तूट नोंदवली गेल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS