Homeताज्या बातम्या

विधान परिषदेच्या 11 जागांचा आज फैसला आजनाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागांकडे राज्याचे लक्ष

मुंबई : राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत 17 पैकी 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.

विधान परिषद निवडणुकीत 150 कोटींचा घोडेबाजारठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप
तटकरे विरूद्ध रोहित पवार वाद उफाळलावर्षा निवासस्थानाचे उंबरठे कोणी झिजवले ?
महायुतीतील अस्वस्थता!


मुंबई : राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत 17 पैकी 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून मतमोजणी आज पार पडणार आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातील चुरशीच्या लढतींमुळे राजकीय वातावरण अधिक रंगले आहे.
या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अमरावती मतदारसंघात काँग्रेसमधील मतभेद उघडपणे समोर आले. पक्षाने मतदानाबाबत तटस्थ राहण्याचे निर्देश दिले असतानाही काही स्थानिक प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे नाशिक तसेच भंडारा-गोंदिया मतदारसंघांमध्ये शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामुळे या मतदारसंघांतील निकालांविषयी उत्सुकता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात एकूण 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 98.90 इतकी राहिली. येथे महायुतीचे सुहास शिरसाठ, महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे आणि अपक्ष उमेदवार इसाक खान यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. मतमोजणी केंद्रावर आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे निकाल प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी वैध मतांच्या निम्म्याहून एक मत अधिक मिळणे आवश्यक असते. पहिल्या पसंतीच्या मतांमधून कोणताही उमेदवार आवश्यक मतसंख्या गाठू शकला नाही, तर पुढील पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये दुसर्‍या पसंतीची मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी मतदान केले. सर्व मते वैध ठरल्यास विजयासाठी सुमारे 310 मतांची आवश्यकता राहणार आहे. येथे मुख्य लढत भाजप समर्थित दोन गटांमध्ये रंगली असल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेर्‍यांनंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिनविरोध निवडून आलेले सहा उमेदवार
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी
पुणे : विक्रम काकडे
ठाणे : रवींद्र फाटक
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी
अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

COMMENTS