Homeताज्या बातम्यादेश

टोयोटा किर्लोस्करचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

नवी दिल्ली : मोटार वाहन उद्योगातील दिग्गज, टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे मंगळवारी निधन झाले. हृद

कृषी कायदे विरोधात देशव्यापी संप व आंदोलनाला घोटीत उस्फुर्त प्रतिसाद
फेसबुकवर अवैध धंद्याच्या लाईव्ह शूटींगने पोलिसांसमोर आव्हान
बीबीसीला दिल्ली हायकोर्टाचे समन्स

नवी दिल्ली : मोटार वाहन उद्योगातील दिग्गज, टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे मंगळवारी निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आत्याने वयाच्या 64 वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. यानंतर त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी असा परिवार आहे. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. आपल्या कार्यकुशल नेतृत्वामुळे टोयोटा कारला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन जाण्यात, लोकांच्या मनात या कारविषयी विश्‍वास आणि आवड निर्माण करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यांच्या जाण्याने उद्योग जगतावर शोककळा पसरली आहे.
किर्लोस्कर यांनी मँसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून (एमआईटी) मॅकेनिकल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले होते. त्यांनी उखख, डख-च् आणि -ठ-ख मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. 1888 मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर समुहाची स्थापना केली. ते किर्लोस्कर समुहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. याशिवाय किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. 25 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या एका कार्यक्रमात विक्रम किर्लोस्कर हे शेवटचे सार्वजनिक व्यासपीठावर आले होते. टोयोटा इंडियाने मीडिया निवेदन जारी करून त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे. 29 नोव्हेंबर 2022 रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांच्या अकाली निधनाबद्दल आम्हाला कळवताना अत्यंत दु:ख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. आम्ही त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. बंगळुरुमध्ये मुख्यालय असलेल्या बायकॉन या औषध क्षेत्रातील कंपनीचे एक्झिक्युटीव्ह चेअरपर्सन किरण मुझूमदार-शॉ यांनीही विक्रम किर्लोस्करांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. विक्रम यांच्या निधनाच्या वृत्तामुळे धक्का बसला आहे. तो माझा फार चांगला मित्र होता. गितांजली, मानसी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही किरण यांनी म्हटले आहे.

COMMENTS