Homeताज्या बातम्या

मोदींचं कौतुक करता, मग दुबईला का जाता? राज ठाकरेंचा विवेक ओबेरॉय, आर. माधवन यांना सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांच्या दुबईतील वास्तव्यासंदर्भात सवाल उपस्थित करत नवा वाद निर्माण केला आहे.मनसे

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारची मोठी पावले; कान्स दौरा रद्द करत इंधन आणि सरकारी खर्चात केली कपात!
कायद्याचे उल्लंघन करणार्‍या माफियांचे धाबे दणाणलेऑटो चालकावर 1 लाख 15 हजार रुपयांचा दंड
आ. संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यशबीड एसटी आगाराच्या ताफ्यात 5 अत्याधुनिक ’राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांच्या दुबईतील वास्तव्यासंदर्भात सवाल उपस्थित करत नवा वाद निर्माण केला आहे.मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी जेन झी पिढी, देशातील उद्योग आणि कलाकारांच्या भूमिकेवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करणारे काही कलाकार परदेशात का स्थायिक होतात, असा प्रश्न उपस्थित केला.”देशात विकास होत असल्याचा विश्वास आहे, देशावर प्रेम आहे, तर मग हे कलाकार कुटुंबासह दुबईला का राहायला गेले?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.यावेळी त्यांनी विवेक ओबेरॉय आणि आर. माधवन यांच्या नावाचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर आणि देशातील परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.

COMMENTS