Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देगलूरच्या रुग्णालयासाठी 22.97 कोटींचा निधी मंजूर; 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारणार

नांदेड :देगलूरसह सीमावर्ती परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि तातडीची आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्यसभा खासदार डॉ.

बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान; बाळासाहेब सोनटक्के यांच्या हस्ते सत्कार
शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी अधांतरी; जिल्हा परिषद-आरोग्य विभागाच्या टोलवाटोलवीमुळे संशयाचे सावट
कोट्यवधींचा आरोग्य निधी वाया, खाबूगिरीला लगाम; डॉ. संगीता देशमुख निलंबित

नांदेड :
देगलूरसह सीमावर्ती परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि तातडीची आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. देगलूर येथे 22 कोटी 97 लाख रुपयांच्या निधीतून 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्याने नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत मोठी भर पडणार आहे.
कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर वसलेला देगलूर तालुका व्यापारी, सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. नांदेडनंतर मोठे शहर म्हणून ओळख असलेल्या देगलूरमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे अनेकांना नांदेड किंवा इतर शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. या पार्श्वभूमीवर 100 खाटांचे श्रेणीवर्धित शासकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय स्थानिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नव्या रुग्णालयात आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार असून सीमावर्ती भागातील हजारो नागरिकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. या प्रकल्पासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मंत्रालयीन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. विविध बैठका, पत्रव्यवहार आणि संबंधित विभागांशी समन्वय साधत त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने देगलूरच्या विकासाला नवी चालना मिळाली आहे. सीमेवरील आरोग्याची निकड, शासनाची विकासाची फुंकर; देगलूरमध्ये आता उपचारांचा नवा सुगंध दरवळणार! अशा शब्दांत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, हा निर्णय सीमावर्ती भागासाठी आरोग्यसेवेचा नवा अध्याय ठरणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS