Homeताज्या बातम्या

सा. बां. विभागात सेवा, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचा गौरवउपअभियंता संजय घरत, माधव पंडिलवाड आणि काशिनाथ इंगळे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागात सेवेतील प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि जनहिताची जपणूक करत प्रदीर्घ काळ कार्य बजावणारे उपअभियंता श्री संजय घरत,

अभियंता महेंद्र किणी आणि अजय जाधव यांचा संगनमताने अपहारसा.बां. पालघर विभाग, आणि उपविभागामध्ये 300 कोटींचा भ्रष्टाचारडॉ. अशोक सोनवणे
लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमकमहावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा
अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंच्या चौकशीला विलंब का ?कोट्यावधींच्या अपहारानंतर, गुन्हे दाखल असतांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चुप्पी का ?अशोक सोनवणे


मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागात सेवेतील प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि जनहिताची जपणूक करत प्रदीर्घ काळ कार्य बजावणारे उपअभियंता श्री संजय घरत, श्री माधव पंडिलवाड आणि श्री काशिनाथ इंगळे हे अधिकारी मंगळवारी 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या गौरवार्थ मंगळवारी सार्वजनिक बांधकाम भवन येथे सेवापूर्ती सत्कार सोहळा भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञाताई वाळके होत्या, तर अधीक्षक अभियंता सुषमाताई गायकवाड, दैनिक लोकमंथनचे संपादक डॉ. अशोक सोनवणे, इंजि. रोहित सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी निवृत्त अधिकार्‍यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञाताई वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, सार्वजनिक सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणा, शिस्त आणि लोकाभिमुख दृष्टीकोन जपणे अत्यंत महत्त्वाचे असते. संजय घरत, माधव पंडिलवाड आणि काशिनाथ इंगळे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात या मूल्यांचे जतन करून विभागाची प्रतिष्ठा उंचावली आहे. अधीक्षक अभियंता सुषमाताई गायकवाड यांनीही निवृत्त अधिकार्‍यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, सेवेतून निवृत्ती हा एका प्रवासाचा शेवट नसून नव्या जीवनप्रवासाची सुरुवात आहे आणि त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजाला पुढेही मिळत राहील. डॉ. अशोक सोनवणे यांनी देखील आपल्या भाषणात या अधिकार्‍यांना शुभेच्छा देतांना या अधिकार्‍यांनी आपल्या सेवाकाळात सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी कर्तव्यदक्षतेने काम केले.
यावेळी सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांनी निवृत्त अधिकार्‍यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी कार्यकारी अभियंता श्री फेगडे, कार्यकारी अभियंता श्रीमती जाधव मॅडम, उप अभियंता श्री डावखर, श्री अशोक गायकवाड, श्री शिंगाडे, ठेकेदार श्री दादा इंगळे, नगरसेवक श्री गंगाधरे, भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री मुकूंद काकड यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत भावनिक भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे वातावरण कृतज्ञता, सन्मान आणि आपुलकीने भारावून गेले होते. सेवापूर्ती सोहळ्याने निवृत्त अधिकार्‍यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या उज्ज्वल व निरामय भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

COMMENTS