नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार

अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला ; दहा दिवसात शरण येण्याचे आदेश

नवी दिल्ली : भाजपचे नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयात देखील दिलासा मिळालेला नसून, त्यांना येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित

वाडिया पार्कमध्ये रंगणार छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा
जेऊर कुंभारी येथे कोरोना नियमांचे पालन करत भीम जयंती साजरी
कपडे धुण्यासाठी गेलेली महिला ओढ्यात गेली वाहून

नवी दिल्ली : भाजपचे नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयात देखील दिलासा मिळालेला नसून, त्यांना येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्याने हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
नितेश राणे यांना येत्या दहा दिवसांसाठी अटकेपासून संरक्षण मिळालेले आहे. त्यामुळे आता कनिष्ठ कोर्टात नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच नितेश राणेंवरील आरोप खोटे असून राजकीय सुडापोटी करण्यात आलेले हे आरोप असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचा राणेंच्या वकिलांनी सांगितले. सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांच्या समोर नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. नितेश राणे यांच्यावतीने मुकूल रोहतगी तर राज्य सरकारच्यावतीनं अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. कोर्टात दोन्ही बाजूनं जोरादर युक्तिवाद करण्यात आला. पुढच्या दहा दिवसात नितेश राणे यांनी नियमित जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करायचा आहे. त्याकरता दहा दिवसांची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे, असं राणेंचे वकील देसाई यांनी सांगितले. पण कोर्टाने ऑर्डरपास करून त्यांना नियमित जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे, असं देसाई म्हणाले. अटकपूर्व जामीन म्हणजे अटक होण्याच्या अगोदर किंवा अटक झाल्या झाल्या सीआरपीसी 438 नुसार अर्ज करता येतो. रेग्युलर जामीन म्हणजे अटक झाल्यानंतरचा जामीन असतो. त्यामुळे सेशन कोर्टात जाऊन आम्हाला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा लागेल. फरक फक्त एवढाच की आम्ही स्वत:हून गेलो असलो तरी आम्हाला अटक झालेली नसेल. आम्ही पोलिसांच्या कस्टडीत नसू. त्यामुळे आम्हाला दहा दिवसांचं संरक्षण आहे, असंही त्यांनी सांगितलं. नितेश यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. राजकीय कारणासाठी खोडसाळ कारणे देऊन त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा युक्तिवाद आम्ही केला. तर नितेश राणेंची अजून चौकशी करायची आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. गोट्या सावंतचा अर्ज अजून कोर्टात सुनावणीसाठी आला नाही. उद्या कदाचित येईल. मनिष दळवींना जामीन मिळालेला आहे, असेही ते म्हणाले.

COMMENTS