Homeताज्या बातम्या

अभियंता महेंद्र किणी आणि अजय जाधव यांचा संगनमताने अपहारसा.बां. पालघर विभाग, आणि उपविभागामध्ये 300 कोटींचा भ्रष्टाचारडॉ. अशोक सोनवणे

मुंबई : सार्वजनिक बांधकाम पालघर विभाग आणि उपविभागामध्ये भ्रष्टाचाराने उंच टोक गाठले असून कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या कृपाशीवार्दाने वि

उप अभियंता अजय जाधवच्या 300 कोटी घोटाळ्याची एसीबी आणि ईडीकडे तक्रारकार्यकारी अभियंता महेंद्र किणीचा कृपाशीर्वाद ? ; पालघर विभाग, आणि उपविभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार
दैनिक लोकमंथनची प्रमुख मागणीअधीक्षक अभियंता अविनाश धोंडगेंची पदोन्नती थांबवावीदाखल गुन्हे, प्रलंबित चौकश्या पूर्ण होईपर्यंत साईड पोस्टिंग द्यावीबनावट शिफारसपत्रांच्या आधारे कामे मंजूर प्रकरणात कारवाई व्हावी
अभियंता किणी आणि जाधव यांचा आदिवासींच्या निधींवरच डल्ला !300 कोटींच्या निधी अपहारप्रकरणी दैनिक लोकमंथन करणार जनहित याचिका


मुंबई : सार्वजनिक बांधकाम पालघर विभाग आणि उपविभागामध्ये भ्रष्टाचाराने उंच टोक गाठले असून कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या कृपाशीवार्दाने विभाग आणि उपविभागात शासकीय निधीचा अपहार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उप अभियंता अजय जाधव, पगारे यादव यांनी संगनमताने शासकीय निधीचा तब्बल 300 कोटींपेंक्षा अधिक निधीचा अपहार केल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, गेल्या आर्थिक वर्षात पालघर उपविभागात तब्बल 300 कोटींची कामे करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने डीपीडीसी, एमओडब्ल्यू, आदिवासी विकास आणि देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात आली. या कामांमध्ये पालघर उपविभागातील शाखा अभियंता आशिष संखे, अरूण चौधरी, गालफाडे, गायकवाड पावरा या अधिकार्‍यांनी संगनमताने कोट्यावधींची निधी कामे न करताच हडप केला असून, याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खातेनिहाय चौकशी या अधिकार्‍याची होणे गरजेचे आहे. तसेच शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. या उपविभागात टेंडर कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर घोटाळा घालण्यात आला असून, त्यामध्ये प्रामुख्याने टेंडर क्लार्क मनीष म्हात्रे याने कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि उप अभियंता अजय जाधव आणि शाखा अभियंता यांच्या वरदहस्ताने हा घोटाळा घालत या सर्वच अधिकार्‍यांनी संगनमताने कोटयावधी रूपयांचा मलिदा लाटत शासकीय निधीचा अपहार केला आहे.
यासंदर्भातील विशेष माहिती अशी की, महेंद्र किणी पूर्वी याच उपविभागात उपअभियंता होते. पदोन्नती मिळाल्यानंतर रत्नागिरी येथे अवघे एक वर्ष काढल्यानंतर पुन्हा कार्यकारी अभियंता म्हणून पालघर विभागात बदली करून घेतली. उपअभियंता ते कार्यकारी अभियंता म्हणून कार्यकाळ महेंद्र किणी पालघर मध्ये काढून मोठा भ्रष्टाचार करतांना दिसून येत आहे. तसेच अजय जाधव देखील पूर्वी याच उपविभागात शाखा अभियंता होते, ते आजमितीस उप अभियंता आहेत. त्यामुळे या अधिकार्‍यांची मिलीभगत असून त्यांनी संगनमताने या विभागात भ्रष्टाचार करतांना दिसून येत आहे. या उपविभागात त्यांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे उंच टोक गाठले असून, कामे न करताच, तसेच बोगस निविदा काढून कोट्यावधी रूपयांच्या निधींचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच या अधिकार्‍यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची गंधवार्ताही तिथले कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांना लागू दिली नाही, याबदद्ल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS