Homeताज्या बातम्या

डॉ. कुमार सप्तर्षी यांनी शेकडो कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली; प्रा. सुशीलाताई मोराळे यांचे प्रतिपादन

बीड: युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली. त्

तुलसी महाविद्यालयात विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; आयटी, डेटा सायन्स, व्यवस्थापन व पत्रकारिता क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी
देवळाली प्रवरा येथील दोन उद्योजक शेतकरी पुत्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विशेष गौरव
लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकाची अडीच लाखांची फसवणूक; लग्न लावून नवरी झाली पसार, राहाता पोलिसांत गुन्हा दाखल

बीड: युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी महाराष्ट्रातील शेकडो कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी दिली. त्यांच्या निधनामुळे परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी झाली आहे, असे मत प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी व्यक्त केले.

जनक्रांती अभियानाच्या वतीने डॉ. कुमार सप्तर्षी यांना शुक्रवारी (दि. २४ जुलै) भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नेते दादासाहेब मुंडे होते.

यावेळी बोलताना प्रा. मोराळे म्हणाल्या की, समाजातील अन्याय-अत्याचाराविरोधात तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने डॉ. कुमार सप्तर्षी यांनी १९६७ मध्ये युवक क्रांती दलाची स्थापना केली. १९७० मध्ये प्रा. सुंदर गव्हाणे यांनी मराठवाड्यात संघटनेचा विस्तार केला. जनार्दन तुपे यांच्यावर जिल्हा कार्यवाहाची, तर माझ्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात संघटना उभी करण्यात आली.

दलित शिष्यवृत्ती वाढीसाठी झालेल्या आंदोलनात युक्रांदने दलित पँथरसह खांद्याला खांदा लावून लढा दिला. तसेच १९७४ च्या मराठवाडा विकास आंदोलन, एसटी भाडेवाढ आंदोलन आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातही युक्रांदने अत्यंत सक्रिय भूमिका बजावली, असे त्यांनी सांगितले.

या शोकसभेस प्राचार्य सविता शेटे, प्रा. पंडित तुपे, अमर शेख, संगमेश्वर आंधळकर, दिनकर तांदळे, बाळासाहेब गोरे, राजेंद्र आमटे, शफिकभाऊ, सुहास जायभाये, अविनाश डरफे, डॉ. संजय तांदळे, शेख आदनान, विजय घेवारे, ज्योतीराम हुरकुडे, पोपट जगताप, गणेश मस्के, सय्यद मुसा, सय्यद अब्दुल करीम, नितीन जायभाये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS