Homeताज्या बातम्या

लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमकमहावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा

संगमनेर: संगमनेरमध्ये मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडून भारनियमच्या नावाखाली सातत्याने अनियमित, खंडित होणारा वीजपुरवठा केला जातो. यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा रोष वाढत असून तातडीने यावर उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज नागरिकांनी एमएसईबी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, अर्चना  बालोडे, निखिल पापडेजा ,वैष्णव मूर्तडक , गुंजाळवाडी चे सरपंच अमोल गुंजाळ,आनंद वर्पे यांसह नागरिक उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे नागरिकांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. सायंकाळची वेळ ही विद्यार्थ्यांच्या शाळेतून घरी येण्याची असून पावसाळी दिवस असल्याने अंधार लवकर पडतो त्यामुळे रस्त्याने येताना हिंस्र प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वीज उपलब्ध होत नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यात जाऊन गाई म्हशींचे दूध काढणे व त्याची साफसफाई करणे ही सगळी कामे अंधारात करावी लागतात हे करणे खूप अवघड आहे. या सर्व समस्यांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.तरी या सर्व गोष्टींचा विचार करून प्रशासनाने विद्युत पुरवठा संध्याकाळी करू नये. अखंडित अनियमित वीज पुरवठ्यावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही डॉ. जयश्रीताई थोरात यांसह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी महावितरणचे  कार्यकारी अभियंता वट्टमवार यांनी हे निवेदन स्वीकारले व तातडीने उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.मागील अनेक दिवसांपासून संगमनेर शहरासह ग्रामीण भागामध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महावितरण या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष देत नाही. तालुक्यात वीजपुरवठा कमी दाबाने व वेळी सुरू आहे. महावितरण कडे विचारणा केल्यास त्यांच्याकडे कोणतीही ठोस कारण नाही हे अत्यंत चुकीचे आहे. यावर तातडीने मार्ग काढावा अन्यथा तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालय विरोधात तीव्र आंदोलन करतील असा इशाराही डॉ. जयश्री थोरात यांनी दिला आहे.

राजकीय हस्तक्षेपामुळे संगमनेरचा रेल्वे मार्ग बदललामाजी मंत्री थोरात ; वाढत्या हप्तेखोरी व टक्केवारीबाबत चिंता व्यक्त
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सुविधांचे नियोजन करा : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे
‘कोरेश्वर’देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी फाळके

COMMENTS