Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईला टीबीमुक्त करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक; राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे प्रतिपादन

मुंबई : "टीबी मुक्त भारत अभियान" मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज

तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला पदभार; अन्न-औषध प्रशासन विभागाची धुरा खांद्यावर
प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी शासनासाठी उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री फडणवीस; इक्विनिक्स एमबी 3 डेटा सेंटरचे उद्घाटन
आंदोलनकर्त्यांनी संयम बाळगावा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : “टीबी मुक्त भारत अभियान” मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या अभियानाचा शुभारंभ राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय (शीव रुग्णालय) येथे आज करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवी संस्थांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

लोकभवनच्या पुढाकाराने आयोजित “टीबी मुक्त मुंबई” मोहिमेच्या उद्घाटनाला मुंबईच्या महापौर रीतू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, आमदार सुनील शिंदे, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर, मार्केट व गार्डन समितीचे उपाध्यक्ष भास्कर शेट्टी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, डॉक्टर्स, आशा सेविका आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘टीबी मुक्त मुंबई’च्या अभियानावर आधारित माहिती पुस्तिकेचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसराची लोकसंख्या जवळपास दोन कोटींच्या घरात पोहोचली आहे. दाट लोकवस्तीमुळे टीबीसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लोकभवनच्या पुढाकाराने “टीबी मुक्त मुंबई” अभियान सुरू करण्यात आले असून अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. मुंबईला टीबीमुक्त करण्यात आपण यशस्वी झालो, तर ते केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी उदाहरण ठरेल. त्यामुळे मुंबईची प्रतिमा अधिक चांगली होईल.

या अभियानाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, रेड क्रॉस सोसायटी, एनसीसी, ‘माय युवा भारत’चे स्वयंसेवक, स्काऊट व गाईड, स्वयंसेवी संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांना सहभागी केले जाणार आहे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. टीबीवर योग्य वेळी उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी शासनाकडून तपासणी व उपचाराच्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी देश टीबी मुक्त होणे आवश्यक असून त्या दृष्टीने “टीबी मुक्त मुंबई” अभियान महत्त्वाचे आहे. सरकार आणि समाजाने एकत्रित येऊन कार्य केल्यास हमखास यश लाभते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

COMMENTS