Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुस्लिम धर्मगुरु सलमान अजहरींना अटक

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरात एटीएसची मुंबईत कारवाई

मुंबई : मुस्लिम धर्मगुरू आणि इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरींना गुजरात दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने अटक केली आहे. गुजरात एटीएसने ही कारव

वाहन-गृह कर्ज पुन्हा महागले
वनश्री महाडीक मल्टीस्टेट सोसायटीला 56 लाखांचा नफा : राहुल महाडीक
अ‍ॅड. फरेरा आणि गोन्साल्विस यांना जामीन मंजूर

मुंबई : मुस्लिम धर्मगुरू आणि इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरींना गुजरात दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने अटक केली आहे. गुजरात एटीएसने ही कारवाई मुंबईमध्ये केली. अजहरींविरोधात त्यांनी गुजरातमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातच्या जुनागडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या अटकेविरोधात जमावाने गोंधळ घातल्यामुळे त्यांना घाटकोपर पोलिस स्टेशनमधेच ठेवण्यात आले आहे.
गुजरात पोलिसांनी मुफ्ती सलमान अजहरींना अटक केली. त्यानंतर घाटकोपर पोलिस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला होता. हे सगळे मुफ्ती सलमान अजहरींचे समर्थक आहेत. त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.  मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक करून घाटकोपर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. यावेळी सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घाटकोपर भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुफ्ती सलमान अजहरी यांचे समर्थक घाटकोपर पोलिस ठाण्याबाहेर रास्ता रोको करून घोषणाबाजी सुरु केली. त्यांच्या समर्थकांनी अफाट अशी गर्दी केली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनावरचा दबावही वाढला आहे. सोमवारी सकाळी 35 ते 40 पोलीस साध्या वेशात मुफ्ती सलमान अजहरींच्या घरी आले होते. आम्ही तिकडे पोहचलो, त्यांना विनंती केली की काय झाले ते सांगा? मात्र ते म्हणाले तुम्ही सलमान अजहरींना बोलवा. त्यानंतर सलमान अजहरींनी घराचा दरवाजा उघडला. या सगळ्यांना घरात घेतले. त्यानंतर कलम 153 ब च्या अन्वये गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. त्यावर मुफ्ती सलमान अजहरी म्हणाले की मला तुम्ही पोलिस ठाण्यात घेऊन चला, मला नोटीस द्या मी तुम्हाला सहकार्य करतो. मात्र अजूनही मुफ्ती सलमान अजहरी यांना सोडण्यात आलेले नाही. लोकांनी विरोध केला, शांततेच्या मार्गाने आंदोलनही केले पण उपयोग झाला नाही असे वाहिद शेख यांनी सांगितलं. घोषणाबाजी करू नका आणि कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन घाटकोपर पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र मुफ्ती सलमान अजहरी यांचे समर्थक अजूनही येथे जमले आहेत. गुजरात एटीएसला मुफ्तींना गुजरातला न्यायचे आहे. मात्र लोकांची गर्दी पाहता त्यांना अजूनही पोलिस ठाण्यातच ठेवण्यात आलं आहे. मुफ्ती सलमान अजहरी यांनी गुजरातमधल्या जुनागड येथे 31 जानेवारी रोजी प्रक्षोभक भाषण केलं असा त्यांच्यावर आरोप आहे.

कोण आहेत मुफ्ती सलमान अजहरी? – मुफ्ती सलमान अजहरी हे सुन्नी इस्लामिक अभ्यासक आहेत. मुंबईमध्ये त्यांनी जामिया रियाजुल जन्नाह, अल अमन शिक्षण आणि कल्याण संस्था आणि दारुल अमन या संस्थांची त्यांनी स्थापना केलेली आहे. इजिप्तमधील अल-अजहर विश्‍वविद्यालयमधून त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. सलमान अजहरी यांचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत.

COMMENTS