आघाडीचा 57 नगरपंचायतीवर झेंडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आघाडीचा 57 नगरपंचायतीवर झेंडा

भाजप आणि राष्ट्रवादीची सरशी ; काँगे्रस आणि शिवसेनेची मात्र पिछाडी

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील 32 जिल्ह्यातील 106 नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदा

अहमदनगर शहर व जिल्ह्यात आजपासून चौदा दिवस प्रतिबंधात्मक आदेश जारी
 रामनवमीनिमित्त मंदिरात तयारी सुरू असताना दोन गटात हाणामारी
उद्धव ठाकरेंनी फक्त फाईल गायब नाही केल्या , तर बंगले सुद्धा गायब केले –  किरीट सोमय्या

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील 32 जिल्ह्यातील 106 नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये 413 जागांसाठी मतदान पार पडले होते. त्याचा निकाल बुधवारी हाती आला असून, यात सर्वाधिक जागा भाजप आणि राष्ट्रवादी काँगे्रसने जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले तर महाविकास आघाडीने 57 नगरपंचायतीवर झेंडा फडकावला असून, भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र या निवडणुकांत सर्वाधिक पिछेहाट ही शिवसेना आणि काँगे्रस पक्षाची झाल्याचे दिसून आले.
106 पैकी 97 नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. 9 नगरपंचायतींचे निकाल गुरूवारी जाहीर होणार आहेत. भाजपला 24 नगरपंचायती आणि 417 जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला 25 नगरपंचायती आणि 369 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 18 नगरपंचायती आणि 299 जागा तसेच शिवसेनेला 14 नगरपंचायती आणि 290 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीला एकूण 57 नगरंपचायती आणि 976 जागा तर भाजपाला 24 नगरपंचायती 416 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन अशा अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, सुनील शेळके यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले आहे. नितेश राणेदेखील आपला गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनीही सातार्‍यात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना धक्का दिला आहे. तर रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांनीही चमकदार कामगिरी करत ठसा उमटवला आहे. राज्यातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदा, त्याअंतर्गत येणार्‍या 15 पंचायत समित्या, 106 नगरपंचायतींसाठी डिसेंबरमध्ये निवडणुका होणार होत्या. परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द करतानाच या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या जागांवर खुल्या प्रवर्गातून जागा भरण्याचा आदेश दिला होता. यानुसार भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदा, त्याअंतर्गत येणार्‍या पंचायत समित्या, 106 नगरपंचायतींमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या वर्गासाठी मंगळवारी मतदान पार पडले.

जागांचा विचार केल्यास भाजप अव्वल
एकूण जागांचा आणि पक्षाचा विचार केल्यास भाजप (417) पहिल्या क्रमांकावर असून यानंतर अनुक्रमे राष्ट्रवादी (369), काँग्रेस (299) आणि शिवसेनेचा (290) क्रमांक आहे. मात्र 2017 च्या निकालाशी तुलना केली तर भाजपाच राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरत असून राष्ट्रवादी दुसर्‍या, शिवसेना तिसर्‍या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांवर फेकला गेला.

रोहित पाटील यांचा राजकारणात यशस्वी प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश केला आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले असून रोहित पाटील यांचा विजय झाला आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल 6 आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.

COMMENTS