बीड : रविवार, दि. 14 जून 2026 रोजी नागसेन बुद्धविहार येथे आयु. प्रज्ञा विशाल जाधव-आठवले यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर नि

बीड : रविवार, दि. 14 जून 2026 रोजी नागसेन बुद्धविहार येथे आयु. प्रज्ञा विशाल जाधव-आठवले यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल परिसरातील बौद्ध उपासक-उपासिकांच्या वतीने उत्साहपूर्ण सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात जाधव-आठवले परिवारातील सदस्यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून केली. त्यानंतर आयु. एस. ए. सोणवणे यांनी बुद्धवंदना घेत कार्यक्रमाला धार्मिक व शांततामय वातावरण प्राप्त करून दिले. या प्रसंगी उमाजी वाघमारे, प्रा. व्ही. आर. गाडे, प्रा. आर. आर. डी. जाधव, अॅड. के. आर. गाडे तसेच माजी सरपंच मारुती सुरवसे यांच्या हस्ते आयु. प्रज्ञा जाधव-आठवले यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे परिसरातील युवक-युवतींना प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता शांती प्रार्थनेने करण्यात आली. या वेळी नागसेन बुद्धविहार परिसरातील बहुसंख्य बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आनंद व्यक्त करत प्रज्ञा जाधव-आठवले यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS