शिरूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे

शिरूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत शिवश्री कृषी मंडळ, हिवरसिंगा यांच्या वतीने शिवराम राऊत यांनी निवासी उपजिल्हाधिकारी (बीड) यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, नियमित कर्जफेड करणारे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड आणि नूतनीकरण (नवे-जुने) करून बँकिंग व्यवस्थेला मोठे सहकार्य करतात. अशा प्रामाणिक शेतकर्यांना प्रोत्साहन न दिल्यास भविष्यात नियमित कर्जफेडीची वृत्ती कमी होऊन त्याचा थेट परिणाम बँकिंग क्षेत्रावर होऊ शकतो.
त्यामुळे शासनाने थकबाकीदार शेतकर्यांप्रमाणेच नियमित पीककर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांनाही २ लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी रास्त मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शिवश्री कृषी मंडळाच्या वतीने ही मागणी शासनापर्यंत भक्कमपणे पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आमदार, लोकप्रतिनिधी तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही निवेदने देण्यात येणार असल्याचे शिवराम राऊत यांनी याप्रसंगी सांगितले.

COMMENTS