Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

जिल्हाधिकार्‍यांची अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी दि. 12 मे रोजी अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. य

नांदेड जिल्ह्यासाठी 20 मे रोजी येलो अलर्ट
ग्रामीण गृहनिर्माणात नांदेड जिल्हा परिषदेचा राज्यात डंका
खासदारांचा फोन जाताच गुत्तेदार लाईनवर; रखडलेला रस्ताचे काम सुरू



जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी दि. 12 मे रोजी अर्धापूर तहसील कार्यालयास अचानक भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी महसूल विभागासह पंचायत समिती, गट विकास अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, रोजगार हमी योजना विभाग, पुरवठा विभाग, उपकोषागार कार्यालय आणि भूमि अभिलेख कार्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
तहसील कार्यालयात त्यांनी महसूल विभागातील सर्व कार्यासनांना भेट देत प्रत्येक विभागाच्या जाबचार्टची तपासणी केली. तसेच ‘आरटीएस’ अंतर्गत नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या सेवांची पडताळणी करून प्रलंबित प्रकरणे नसल्याची खात्री केली. अभिलेख कक्षालाही भेट देऊन अभिलेखांच्या नक्कल वितरण प्रक्रियेची पाहणी केली व कामकाज अधिक सुलभ आणि प्रभावी करण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. यावेळी तहसील कार्यालयाच्या सभागृहात शासकीय जमिनींच्या अभिलेख पडताळणीसाठी विशेष शिबिर सुरू होते. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि कर्मचारी विविध गटांच्या नोंदींची पडताळणी करत होते. जिल्हाधिकार्‍यांनी या कामाचा आढावा घेत उपस्थित अधिकारी-कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच तहसील कार्यालयाच्या एकूण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनांची माहिती घेतली. शासकीय जमिनींवर निवासी प्रयोजनासाठी झालेल्या अतिक्रमणांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत का, याबाबतही त्यांनी विचारणा केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाच्या कामांची माहिती घेऊन अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. याशिवाय उपकोषागार कार्यालय, भूमि अभिलेख कार्यालय आणि पुरवठा विभागाचीही पाहणी करण्यात आली. पुरवठा विभागाकडून इष्टांकासंदर्भातील माहिती घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या. या पाहणी दौर्‍यावेळी तहसीलदार रेणूकादास देवणीकर, नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे, आश्विनी केंद्रे, अव्वल कारकून विश्वंभर सोळंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS