Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरीबांच्या घराला मिळणार कायदेशीर छत : माजी आ.स्नेहलता कोल्हे

कोपरगाव :  मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा वगळता राज्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील

प्रकल्प स्पर्धेतून विद्यार्थ्यांना नवसंशोधनाची संधी : उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ
अकोलेत ‘फुलोकी होली’ समारंभ उत्साहात
‘ठोळे’ विद्यालयात रहिवासी प्रमाणपत्र वितरण सोहळा

कोपरगाव :  मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा वगळता राज्यातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचा निवासस्थानाचा प्रश्न सोडविण्यासाठी २०११ पर्यंत झालेली केवळ निवासासाठी अस्तित्वात असलेली अतिक्रमणे या निर्णयानुसार नियमित करण्यात येणार आहेत. यामुळे कोपरगांव मतदारसंघातील या निर्णयाच्या अखत्यारीत येणारे जागांचे प्रश्न निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या निर्णयाबद्दल माजी. आ. स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याने वेगवेगळ्या शासन मान्यतेची गरज लागणार नाही. या समित्याच निर्णय घेतील त्यामुळे कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातीलही नागरिकांना या निर्णयाने फायदा होणार असल्याचे कोल्हे म्हणाल्या आहेत.

COMMENTS