Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेकडून स्तनदा मातांसाठी पोषण कार्यक्रम  

नाशिक प्रतिनिधी - जिल्हा परिषद नाशिक व आय आय टी  मुंबई यांच्या संयुक्त विदयमाने नाशिक जिल्ह्यामध्ये “प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम” राबविण्यात

भारत जोडो चे समन्वयक आ. थोरात यांच्या नियोजनाचे देशात कौतुक
मतदारसंघाशी नाळ घट्ट करण्यासाठी आ. रोहित पवारांकडून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आधार
डिलीव्हरी बॉयची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

नाशिक प्रतिनिधी – जिल्हा परिषद नाशिक व आय आय टी  मुंबई यांच्या संयुक्त विदयमाने नाशिक जिल्ह्यामध्ये “प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम” राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व तालुक्यामधून ३०० प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात आली होती व त्यांना मार्च महिन्यामध्ये जिल्हास्तरावर या कार्यक्रमाबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर या ३०० प्रशिक्षणार्थीनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करत होते. त्यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थीने प्रत्येकी १० केसेस दत्तक केले होते. व त्यांचा सखोल अभ्यास करत होते. या ३०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी अंतिम परीक्षे मधून ५९ मेंटर व ३० फॅसिलीटर म्हणून निवड करण्यात आली आहे. मेंटर व फॅसिलीटेटर या पुढे जिल्हयातील सर्व आरोग्य विभाग व आय सी डी एस  विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेणार आहे.

या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हयातील सर्व आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमांतर्गत स्तनपानासाठी “क्रॉस कॅडल होल्ड” या पध्दतीने स्तनपान करण्यावर भर देण्यात आला असून त्याचबरोबर प्रभावी लॅचिंग, स्तनपान करतांना सुरवातीचे संकेत कसे ओळखावे, गरोदर मातेने गरोदरपणात घ्यावयाचा पोषण आहार व बाळाच्या ६ महिने वयानंतर सुरु करण्यात येणा-या पूरक आहारावर विशेष भरत देण्यात आला आहे.

सदयस्थितीमध्ये नाशिक जिल्हयात ० ते ५ वर्ष वयोगटातील एकूण बालकांची संख्या ३,०९,७१८ असून त्यापैकी ४२३ बालके एस ए एम  तर २१७४ बालके एम ए एम  या कुपोषण श्रेणीमध्ये आहेत. सदर कार्यक्रमामुळे हे कुपोषण कमी होण्यासाठी मदत मिळणार आहे.

या सोबतच जिल्हा परिषद नाशिकचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्हातील सर्व आरोग्य संस्थामध्ये “प्रभावी स्तनपान फेरी” व “डिसचार्ज क्रायटेरीया” या दोन उपक्रमांचे सुध्दा प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामुळे बाळाला जन्माच्या नंतर १ तासाच्या आतच स्तनपान सुरु करणे व प्रसुती झालेल्या मातांना प्रभावी स्तनपानाबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात येते. या उपक्रमामुळे बाळाचे वजन वाढीसाठी मदत होणार आहे.

सदर कार्यक्रम नाशिक जिल्ह्यात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून सनियंत्रण श्री. दिपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. सुधाकर मोरे- जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. राजेंद्र बागुल- अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. हर्षल नेहेते- जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, डॉ. दिपक लोणे-सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. युवराज देवेरे- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षलकुमार महाजन- तालुका आरोग्य अधिकारी बागलाण यांचे मार्फत करण्यात येत आहे.

COMMENTS