Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

नाफेडमार्फत तातडीने कांदा खरेदी कराजयंत पाटील ; कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव व अनुदानाची मागणी

मुंबई : राज्यात कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्

कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द करा या मागणीसाठी किसान सभेची निदर्शने
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द कराअकोलेत किसान सभेची निदर्शने


मुंबई : राज्यात कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत त्यांनी कांद्याला किमान दोन हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली. तसेच शेतकर्‍यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रतिक्विंटल पंधराशे रुपयांचे अनुदान जाहीर करावे, असेही त्यांनी सुचवले आहे. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सोलापूर आणि उहहरीींररिींळ डरालहरक्षळपरसरी परिसरातील लाखो शेतकरी कांदा उत्पादनावर अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांत बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होत असल्याचे जयंत पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा खर्च वाढत असताना बाजारात मिळणारा दर उत्पादन खर्चही भरून काढू शकत नसल्याची स्थिती त्यांनी मांडली. राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव कोसळत असल्याने नाफेड आणि इतर शासकीय संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

COMMENTS