माजी मंत्री व ज्येष्ठ सहकार नेते शंकरराव कोल्हे यांचे निधन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री व ज्येष्ठ सहकार नेते शंकरराव कोल्हे यांचे निधन

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, मान्यवरांची उपस्थिती

कोपरगाव/प्रतिनिधी : संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, माजी सहकार मंत्री ज्येष्

हमारी माँगे पुरी करो…कष्टकर्‍यांचा घुमला आवाज
आत्मा मालिकचा विश्‍वजीत देवकर देशात प्रथम
बोठेने मेव्हण्याला हुतात्मा दाखवून घेतला 5 लाखांचा लाभ ; रुणाल जरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कोपरगाव/प्रतिनिधी : संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, माजी सहकार मंत्री ज्येष्ठ नेते शंकरराव गेनुजी कोल्हे यांचे बुधवारी (16 मार्च) पहाटे वयाच्या 93 व्या वर्षी नाशिक येथे सुश्रुत रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या निधनाने तालुक्याची अपरिमित हानी झाली असून ही निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. ज्येष्ठ सहकार नेता आदर्श व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता सहजानंदनगर (तालुका कोपरगाव) येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव येसगाव येथील त्यांच्या वस्तीवर व त्यानंतर दुपारी संजीवनी कारखाना स्थळावर दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी माजी आमदार अशोक काळे, माजी मंत्री मधुकरराव पिचड, सीताराम गायकर यांच्सह मोठ्या प्रमाणावर राजकीय, सामाजिक स्तरातील मान्यवरांनी शंकराराव कोल्हे यांच्या पार्थिवाचे अखेरचे अंत्यदर्शन दर्शन घेतले तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अमर रहे, अमर रहे.. कोल्हे साहेब अमर रहे..च्या घोषणा देण्यात आल्या.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
(स्व.) शंकरराव कोल्हे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा पोलिस दलाने त्यांना मानवंदना दिली. ज्येष्ठ चिरंजीव नितीनदादा कोल्हे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ना. आशुतोष काळे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ. मोनिकाताई राजळे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. अनिलराव आहेर, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, प्रा. राम शिंदे, कृपाशंकर सिंह, पांडुरंग अभंग, चंद्रशेखर कदम, शिवाजी कर्डिले, अण्णासाहेब म्हस्के तसेच दुर्गाताई तांबे, प्रदीप वळसे, प्रमोद जगताप, राजेंद्र नागवडे, भागीरथ शिंदे, माणिकराव बोरस्ते, राजाभाऊ वाजे आदींसह शैक्षणिक, सहकार, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी (स्व.) कोल्हे यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

सहकारातील तळपत्या सूर्याचा अस्त
बुधवारी पहाटे सहकाराच्या तळपत्या सूर्याचा अस्त झाला. एक मातब्बर सहकार तज्ज्ञ, पाणी प्रश्‍नावर शेवटपर्यंत लढा देणारे व सर्व विषयांचा गाढा अभ्यास असलेले नेतृत्व हरपले आहे. त्यांनी शेतकरी सहकारी संघ मर्यादित, कोपरगांव (1953), पूर्वीची कोपरगांव तालुका विकास मंडळ (टीडीबी), सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि, सहजानंदनगर (1960) वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, पुणे (1975), नॅशनल हेवी इंजिनियरींग लि, पुणे (1975), संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुल, खिर्डीगणेश (1978), महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे (1989), अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि, शिंगणापूर (1975), सुवर्णसंजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट लि, शिंगणापूर (1976), गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघ लि, सहजानंदनगर (1976), संजीवनी शैक्षणिक कृषी आणि ग्रामीण विकास विश्‍वस्त संस्था, सहजानंदनगर (1976), कोपरगांव औद्योगिक सहकारी वसाहत, कोपरगांव (1975), संजीवनी एज्युकेशन सोसायटी, सहजानंदनगर (1982), यशवंत कुक्कुट सहकारी पालन व्यावसायिक संस्था लि., येसगांव (1986), संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी मोटार ड्रायव्हींग स्कूल, सहजानंदनगर (1992), संजीवनी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोपरगांव (1984), साई संजीवनी सहकारी बँक लि, कोपरगांव (1996), संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्था लि. शिंगणापूर (1996), एकलव्य आदिवासी आश्रमशाळा, टाकळी (2000) इत्यादी संस्था त्यांनी स्थापन केल्या.
कोपरगांव येथे इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन अ‍ॅग़्रीकल्चर संस्थेची स्थापना करताना दिनांक 29.07.2000 रोजी जागतिक व्यापार संघटनेच्या पटलावर भारतातील शेतकर्‍यांना संरक्षण मिळावे, येथील शेती व्यवसाय टिकावा यासाठी कोपरगांव येथे इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन अ‍ॅग्रीकल्चर संस्थेची स्थापना करून त्या माध्यमांतून तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री नितीश कुमार यांच्यापुढे निवेदन सादर करून येथील शेतीला व शेतमालाला संरक्षण मागितले तसेच कॅनकुन येथील जागतिक व्यापार संघटनेच्या परिषदेच्या बैठकीस इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन अ‍ॅग्रीकल्चर संस्थेचे प्रतिनिधी पाठवून भारतातील शेतकर्‍यांना व त्यांच्या शेतमालास संरक्षण मिळविण्यासाठी जागतिक पटलावर त्यांनी काम केले.

COMMENTS