Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बर्गेवाडीत गोदड महाराजांच्या पादुकांची शोभायात्रा

कर्जत : रामनवमीच्या पवित्र निमित्ताने कर्जत तालुक्यातील बर्गेवाडी येथे संत सद्गुरू गोदड महाराजांच्या पादुकांची भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात

जामखेड सेंट्रल बँकेत कॅश टंचाई; अधिकाऱ्यांची उद्धट भाषा ; ग्राहकांचा संताप
‘मुनोत महिला गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा सन्मान
धर्मरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज : प्रकाशानंदगिरी महाराज; चांदा येथे विराट हिंदू संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्जत : रामनवमीच्या पवित्र निमित्ताने कर्जत तालुक्यातील बर्गेवाडी येथे संत सद्गुरू गोदड महाराजांच्या पादुकांची भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. वाजत, गाजत, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

बर्गेवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने हा अनोखा उपक्रम ग्रामस्थ व युवकांच्या पुढाकारातून राबविण्यात आला. राज्यातील प्रसिद्ध संत सद्गुरू गोदड महाराजांच्या पादुका सजवलेल्या भव्य रथातून कर्जत मधील समाधी मंदिरापासून बर्गेवाडीपर्यंत मोठ्या उत्साहात आणण्यात आल्या. “गोदडनाथ एकनाथाचा जयघोष” करत वारकऱ्यांनी भगव्या पताका खांद्यावर घेत मिरवणुकीत सहभाग घेतला.

बर्गेवाडीत आगमन होताच पादुकांचे अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या शेकडो महिलांनी हातात पंचारती घेऊन पुष्पवृष्टी करत स्वागत केले. यावेळी कर्जत नगरपंचायतीच्या नगरसेविका मोहिनी दत्तात्रय पिसाळ यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.  

या सोहळ्यास मंदिराचे पुजारी पंढरीनाथ काकडे, काकासाहेब धांडे, आबासाहेब पाटील, नानासाहेब सोनमाळी, रवींद्र पिसाळ, बापूसाहेब नेटके, कुषाभाऊ नेटके, बरबडे, भाऊसाहेब पिसाळ, कृष्णा पिसाळ यांच्यासह ग्रामस्थ, युवक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS