Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

10 जुलैपासून शिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात शाळा भरवणार

चकलांबा येथील संतप्त पालकांचा इशारा

चकलंबा प्रतिनिधी - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांची आणि शिपाई पदांची भरती तात्काळ करण्यात यावी यासाठी चकलांबा येथील पाल

पत्नी रुग्णालयात, मुलाचं कोविडशी युद्ध, तरी हा माणूस उभा! ; जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचे केले कौतुक
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे
शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना | LOKNews24

चकलंबा प्रतिनिधी – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांची आणि शिपाई पदांची भरती तात्काळ करण्यात यावी यासाठी चकलांबा येथील पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी आज एक दिवसाची लाक्षणिक उपोषण केले आहे 10 जुलै पर्यंत ही पदे न भरल्यास शिक्षणाधिकार्‍यांच्या दालनातच सर्व विद्यार्थी पालकांसह शाळा भरवण्यात येईल असा संतप्त इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चकलांबा ही जिल्ह्यातील एक सर्वात मोठी आणि निजामकालीन शाळा आहे या शाळेचा सध्याचा जवळजवळ 900 विद्यार्थ्यांची संख्या असून या शाळेत तीन माध्यमिक सहा प्राथमिक आणि एक सहशिक्षक तसेच तीन परिचर अशी रिक्त पदे असून एकूण शिक्षकांची 10 पदे आहेत शाळा चालवण्यासाठी या ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे वर्षानुवर्ष मागणी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे 2023 आणि 2024 या शैक्षणिक वर्षात तरी या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी दिनांक 3 जुलै रोजी शाळेच्या प्रांगणात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे दिनांक दहा जुलै पर्यंत शिक्षकांची पदे न भरल्यास शिक्षणाधिकार्‍यांच्या दालनातच विद्यार्थी आणि पालकांसह शाळा भरवण्यात येईल असा संतप्त इशारा गावकर्‍यांच्या वतीने देण्यात आला आहे यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी आणि खुद्द जिल्हाधिकारी मुधोळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी उचलण्यास नकार दिला आहे.

COMMENTS