नेवासा : समाजातील भेदभाव दूर करून हिंदू समाज संघटित व्हावा आणि देव, देश व धर्मासाठी कार्यरत राहावे, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. प्रकाशानंदगिरी महाराज यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त श्री दत्त साधकाश्रम, चांदा येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात ते बोलत होते. या संमेलनास चांदा पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील, संघाचे नेवासा तालुका कार्यवाह सुनील सावंत यांच्यासह चांदा, रस्तापूर, कौठा, बऱ्हाणपूर, म्हाळस पिंपळगाव आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले, संघाचे कार्य देव, देश व धर्माच्या उत्थानासाठी प्रेरणादायी आहे. स्वयंसेवक घरोघरी जाऊन समाजजागृतीचे काम करत आहेत. सर्वांनी जातीभेद विसरून एकत्र येत धर्मकार्यासाठी पुढे यावे. कुटुंबात मुलांवर योग्य संस्कार करणे आवश्यक असून, धर्मकार्यात केवळ प्रेक्षक न राहता रक्षक बनावे, असे त्यांनी आवाहन केले. कृष्णाजी घरोटे यांनी संघाच्या कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, संघाच्या शाखांमधून आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य केले जाते. समाजातील प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून वागल्यास राष्ट्र अधिक प्रबळ होईल. समाजपरिवर्तनातूनच देश विश्वगुरू बनू शकतो, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात चांदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषेत समाजप्रबोधनपर नाटिका सादर केली. उपक्रमशील शिक्षिका शांता मरकड-दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या नाटिकेचे उपस्थितांनी कौतुक केले. संमेलनाच्या पूर्वतयारीत सात गावांतील २,२३८ हिंदू घरांमध्ये ‘गृहसंवाद अभियान’ राबविण्यात आले. या अभियानात सुमारे ४० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याची माहिती प्रास्ताविकात ह.भ.प. योगेश्वरीताई दरंदले यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती सदस्य अमोल अंबाडे यांनी केले.

नेवासा : समाजातील भेदभाव दूर करून हिंदू समाज संघटित व्हावा आणि देव, देश व धर्मासाठी कार्यरत राहावे, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. प्रकाशानंदगिरी महाराज यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त श्री दत्त साधकाश्रम, चांदा येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात ते बोलत होते. या संमेलनास चांदा पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे पाटील, संघाचे नेवासा तालुका कार्यवाह सुनील सावंत यांच्यासह चांदा, रस्तापूर, कौठा, बऱ्हाणपूर, म्हाळस पिंपळगाव आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले, संघाचे कार्य देव, देश व धर्माच्या उत्थानासाठी प्रेरणादायी आहे. स्वयंसेवक घरोघरी जाऊन समाजजागृतीचे काम करत आहेत. सर्वांनी जातीभेद विसरून एकत्र येत धर्मकार्यासाठी पुढे यावे. कुटुंबात मुलांवर योग्य संस्कार करणे आवश्यक असून, धर्मकार्यात केवळ प्रेक्षक न राहता रक्षक बनावे, असे त्यांनी आवाहन केले.
कृष्णाजी घरोटे यांनी संघाच्या कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, संघाच्या शाखांमधून आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य केले जाते. समाजातील प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून वागल्यास राष्ट्र अधिक प्रबळ होईल. समाजपरिवर्तनातूनच देश विश्वगुरू बनू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात चांदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषेत समाजप्रबोधनपर नाटिका सादर केली. उपक्रमशील शिक्षिका शांता मरकड-दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या नाटिकेचे उपस्थितांनी कौतुक केले.
संमेलनाच्या पूर्वतयारीत सात गावांतील २,२३८ हिंदू घरांमध्ये ‘गृहसंवाद अभियान’ राबविण्यात आले. या अभियानात सुमारे ४० कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याची माहिती प्रास्ताविकात ह.भ.प. योगेश्वरीताई दरंदले यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती सदस्य अमोल अंबाडे यांनी केले.

COMMENTS