जामखेड : तालुक्यातील नान्नज येथील अलमेर हारुण शेख याने 'चार्टर्ड अकाउंटंट' ही पदवी प्राप्त करून शैक्षणिक आणि व्यावसायिक एक महत्वपूर्ण टप्पा गाठल

जामखेड : तालुक्यातील नान्नज येथील अलमेर हारुण शेख याने ‘चार्टर्ड अकाउंटंट’ ही पदवी प्राप्त करून शैक्षणिक आणि व्यावसायिक एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक असलेल्या या अभ्यासक्रमात अलमेरने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीने, शिस्तबद्ध अभ्यासाने आणि जिद्दीने हे यश संपादन केले आहे.
अलमेरचा ‘सीए’ बनण्यापर्यंतचा हा प्रवास त्याच्या वैयक्तिक चिकाटीचा आणि भक्कम कौटुंबिक पाठबळाचा पुरावा आहे. अनेक वर्षांची खडतर तयारी आणि ‘आर्टिकलशिप’च्या कालावधीत अलमेरने आपले पूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित केले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) गुंतागुंतीच्या अभ्यासक्रमावर त्याने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मात केली.या यशाबद्दल बोलताना अलमेरने आपल्या यशाचे श्रेय त्याने आपली आई यास्मिन शेख यांना दिले आहे.
तसेच, वडील हारुण याकूब शेख (निवृत्त उप-महाव्यवस्थापक, एमटीएनएल) यांच्या आर्थिक मदतीमुळे आणि अढळ विश्वासामुळेच कोणत्याही तडजोडीशवाय शिक्षण पूर्ण करणे शक्य झाले, असेही तो म्हणाला. अलमेरने कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “हे यश जितके माझे आहे, तितकेच माझ्या पालकांचेही आहे. वडिलांचे कष्ट आणि आईचे आशीर्वाद हेच माझ्या प्रत्येक कठीण काळात माझे मुख्य आधारस्तंभ होते.”
भविष्यात कराधान (टॅक्सटीओन) आणि वित्त (फायनस) या क्षेत्रांत आपले कौशल्य पणाला लावून देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देण्याचा त्याचा मानस आहे. चार्टर्ड अकाऊंटंट सीए परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा नान्नज येथे सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच महेंद्र मोहळकर, पत्रकार समीर शेख, अमर चाऊस, सदाम पठाण अजर पठाण, मजर पठाण, बापू साठे, शहारूक कुरेशी, इरफान पठाण, तुषार माकूडे, कालू पठाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS