Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इज्तेमाच्या मंडप उभारणीचा माजी आ.अशोकराव काळेंच्या हस्ते प्रारंभ

 कोपरगाव : तालुक्यातील सुरेगाव,कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार कोपरगाव-राहाता ताल

कोपरगावात मंगळवारी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन कार्यशाळा
राहाता येथील गर्भलिंग निदान प्रकरणी कठोर कारवाई करा
आ. काळेंकडून अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधिमंडळात

 कोपरगाव : तालुक्यातील सुरेगाव,कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार कोपरगाव-राहाता तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात येणारा इज्तेमा हा सुरेगाव-शहाजापूर परीसरात होणार आहे. या इज्तेमाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते गुरुवार (दि.२६) रोजी पार पडला.

मुस्लिम बांधव एकाच ठिकाणी एकत्र येवून सामुहिक प्रार्थना करण्यासाठी व मुस्लीम बांधवांना धार्मिक प्रबोधनासाठी इज्तेमा आयोजन करण्यात येते. हा इज्तेमा आपल्या गावात व्हावा अशी अनेक गावातील मुस्लीम बांधवांची इच्छा असते. ही सुरेगाव, कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील मुस्लीम बांधवांची इच्छा पूर्ण झाली असून कोपरगाव-राहाता तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात येणारा इज्तेमा हा सुरेगाव-शहाजापूर परीसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.          

 यावेळी काळे यांनी सांगितले की, सुरेगाव,कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील व परिसरातील मुस्लीम बांधवांची इच्छा आणि मागणी होती की, आपल्या भागात इज्तेमा व्हावा हि इच्छा पूर्ण होत असल्याचा अतिशय आनंद आहे. या धार्मिक कार्यासाठी सर्व धर्मियांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

  यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे, गौतम बँकेचे मा.व्हा.चेअरमन राजेंद्र ढोमसे, शहाजापूरचे उपसरपंच शरद वाबळे, कोळपेवाडीचे उपसरपंच सागर कोळपे,सुरेगावचे उपसरपंच दीपक कदम, कचरू कोळपे, सुखदेव कोळपे, भाऊसाहेब कोळपे, पोपटराव जुंधारे, पांडुरंग ढोमसे, पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे, प्राचार्य नूर शेख, शिवाजी वर्पे, डॉ.इलियास सय्यद, ॲड.शापिक शेख,शकील पटेल, अल्ताफ पटेल, रज्जाक खाटिक, शब्बीर तांबोळी, शफिक शेख, सोयेब पटेल, मोहीज मणियार आदींसह मुस्लीम बांधव उपस्थित होते.

COMMENTS