संविधान रक्तहीन क्रांतीचे साधन :  सरन्यायाधीश गवई

Homeताज्या बातम्यादेश

संविधान रक्तहीन क्रांतीचे साधन : सरन्यायाधीश गवई

महाराष्ट्र विधिमंडळातर्फे करण्यात आलेल्या सत्कारात वक्तव्य

मुंबई ः भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला स्वाभीमाने जगण्याचा अधिकार दिला, त्याचप्रमाणे आपला उत्कर्ष करण्यासाठीचे अधिकार देखील मिळवून द

महाविकास आघाडीची आजपासून जागा वाटपावर बैठक
एकाच वेळी ४० ते ४५ लोकांना अन्नातून विषबाधा. | LOKNews24
केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा : केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

मुंबई ः भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला स्वाभीमाने जगण्याचा अधिकार दिला, त्याचप्रमाणे आपला उत्कर्ष करण्यासाठीचे अधिकार देखील मिळवून दिले, भारतीय संविधान हे रक्तहीन क्रांती करण्याचे साधन असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मंगळवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र विधिमंडळातर्फे करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सर्वच मंत्री व आमदार उपस्थित होते.


यावेळी बोलताना सरन्यायाधीश म्हणाले की, घटनात्मक पदावर काम करताना सर्वोच्च न्यायालय असो की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असो, तुम्हाला संविधानात नमूद मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वांनुसारच कार्य करणे अभिप्रेत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की, भारताची राज्यघटना या देशात एक रक्तहीन क्रांती निर्माण करण्याचे साधन आहे.

निश्‍चितच आपण 75 वर्षांत या दृष्टिकोनातूनच काम केले. माझ्याविषयी सांगायचे तर, मला जेव्हा केव्हा संधी मिळाली, तेव्हा-तेव्हा मी मार्गदर्शक तत्वे व मुलभूत हक्क यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. ही तारेवरची कसरत असते. परंतु हे पद मला या देशाची व समाजाची सेवा करण्यासाठी मिळाले आहे. त्यामुळे न्यायदानात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मी ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ते पुढे म्हणाले, मला मागील 22 वर्षांच्या कालखंडात न्यायदानाचे चांगले काम करता आले.

बाबासाहेब आंबेडकर व घटनाकारांचे देशात सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित करण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याच्या कार्यात मला खारीचा वाटा उलचण्याची संधी मिळाली. आज आपण सर्वांनी माझा बहुमान केला. हा बहुमान महाराष्ट्राच्या 12 कोटी 87 लाख जनतेने दिलेला सन्मान आहे. मी या जनतेला तुमच्या माध्यमातून वंदन करतो. हा सत्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण, याच विधिमंडळात माझ्या वडिलांनी अनेक वर्षे लोकप्रतिनिधित्व केले. आज त्याच सभागृहात माझा सत्कार होत आहे. ही माझ्यासाठी भूषणावह बाब असल्याचे सरन्यायाधीश गवई यावेळी म्हणाले.

COMMENTS