Homeताज्या बातम्या

आंदोलनकर्त्यांनी संयम बाळगावा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख

ओबीसी आरक्षणावर धक्का लागू देणार नाही; लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर निशाणा
ओबीसी जनगणनेसाठी आंदोलनाचा इशारा : वडेट्टीवार
ओबीसी आरक्षण : १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार
Devendra Fadnavis: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आंदोलन… मुख्यमंत्र्यांची  मोठी...

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, कोणत्याही समाजाच्या हिताला धक्का न लावता सर्वसमावेशक तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्‍या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. या चर्चेतून काही सकारात्मक निष्पन्न होते का, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने यापूर्वीही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. न्यायालयीन आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या तरी त्यावर मार्ग शोधण्याचे प्रयत्न सातत्याने करण्यात आले. राज्य सरकारची भूमिका कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून सर्व समाजांच्या न्याय्य अपेक्षेचा विचार करून निर्णय घेण्याची असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसोबतच इतर मागासवर्गीय (OBC) समाजाच्या आरक्षणाबाबतही सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोणत्याही दोन समाजांमध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. समाजांना एकमेकांसमोर उभे करून राजकीय लाभ मिळवण्याचा सरकारचा हेतू नसून सामाजिक सलोखा आणि न्याय यांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS