Homeताज्या बातम्या

अतिक्रमणाच्या नावाखाली छोट्या व्यापार्‍यांना त्रास देऊ नका मोहम्मद खमरोद्दिन यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन

बीड: बीड शहरात नगरपरिषद मार्फत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान छोट्या गोरगरीब व्यापारांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत बीड शहर

गाव मुकं, कारभारी धष्टपुष्ट अन् शाळा व्हेंटिलेटरवर!
तिरंगा मोर्चात संयम बाळगण्याचे राज ठाकरे यांचे आवाहन; गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
राहता महावितरण कार्यालयाचा रस्ता चिखलात

बीड: बीड शहरात नगरपरिषद मार्फत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान छोट्या गोरगरीब व्यापारांना नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत बीड शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की अतिक्रमण हटाव मोहीम दरम्यान नगरपरिषद ट्राफिक पोलीस विभाग यांच्या मदतीने छोट्या व्यवसायकावर कारवाई करत असून अनेक ठिकाणी अतिक्रमण नसतानाही व्यवसायिकाना अतिक्रमण धारक ठरून त्यांच्या हातगाड्या व साहित्याची तोडफोड केली जात आहे त्यामुळे लहान व्यापाराचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे व्यापार्‍याचे म्हणणे आहे की नाल्याच्या आत किंवा रहदारीला कोणताही अडथळा न होईल अशा ठिकाणी व्यवसाय करणार्‍यावरही कारवाई केली जात आहे संबंधित व्यापार्‍याकडे नगरपरिषद कडून व्यवसाय कराच्या पावत्या असतानाही त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्रास दिला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे यावेळी मोहम्मद खमरोदिन यांनी सांगितले की अतिक्रमण हटविण्याचा व्यापार्‍याचा विरोध नाही मात्र नियमाचे पालन करताना गोरगरीब आणि छोट्या व्यापार्‍यावर अन्याय होता कामा नये अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असून प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवून करावई करावी अतिक्रमणाच्या नावाखाली होत असलेला त्रास तत्काळ थांबून संबंधित कर्मचार्‍यांना योग्य सूचना घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली जिल्हाधिकारी साहेब नगरपरिषद मुख्याधिकारी साहेब यांनी निवेदनाची दखल घेऊन छोट्या व्यापार्‍यांना न्याय मिळावा तसेच कोणत्याही प्रकारच्या अन्याय होणार नाही यासाठी योग्य ती कारवाही करावी अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली

COMMENTS