Homeताज्या बातम्या

भ्रष्टाचारमुक्त पार्टीचे देशव्यापी जनआंदोलन ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत भ्रष्टाचाराविरोधात एल्गार

बीड: देशातील शासन व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण व्हावी, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा आणि एका भ्रष्टाचारमुक्त भारताची मजबूत उभारणी व्हावी, या उद

पुणे-नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना; आ. सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश
केज तालुक्यात माणुसकी हरवली का? तीन मुले आणि एक मुलगी असूनही आषाढीत वृद्ध माऊलीला अन्नासाठी भटकंतीची वेळ
मौलाना आझाद फाऊंडेशनच्या राज्य प्रवक्तेपदी मुशीर इनामदार यांची निवड

बीड: देशातील शासन व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण व्हावी, प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा आणि एका भ्रष्टाचारमुक्त भारताची मजबूत उभारणी व्हावी, या उदात्त हेतूने भ्रष्टाचारमुक्त पार्टी’ च्या वतीने देशव्यापी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गौरव राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर या महत्त्वपूर्ण मोहिमेची सविस्तर घोषणा केली आहे. पक्षाने स्पष्ट केले आहे की, ग्रामपंचायतीपासून ते थेट लोकसभेपर्यंतच्या कोणत्याही स्तरावरील भ्रष्टाचार आता खपवून घेतला जाणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्धचा हा लढा पूर्णपणे संविधान, कायदा आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून शांततापूर्ण, संघटित तसेच कायदेशीर मार्गाने लढला जाईल. नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर स्वतंत्र ’भ्रष्टाचार निवारण समित्या’ स्थापन केल्या जातील. या समिती नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यांची वस्तुनिष्ठ पडताळणी करतील. तसेच, संबंधित शासकीय विभागांकडे पाठपुरावा करून लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असतील. देशभरात व्यापक स्वरूपात सदस्य नोंदणी अभियान राबवून प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर पक्षाचे मजबूत संघटन उभारले जाईल. युवक, शेतकरी, महिला, कामगार, विद्यार्थी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांनी या देशव्यापी अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी कार्यकाळात राबविण्यात येणारे उपक्रम भ्रष्टाचाराविरोधातील हा लढा अधिक तीव्र व व्यापक करण्यासाठी पक्षाने खालील उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे तक्रार निवारण केंद्रे आणि कायदेशीर मार्गदर्शन शिबिरे यांचे आयोजन. पत्रकार परिषद आणि लोकसंवाद कार्यक्रम. लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलने. या महत्त्वपूर्ण घोषणेबाबत बोलताना भ्रष्टाचारमुक्त पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गौरव राठोड म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त भारत हा केवळ एक नारा किंवा घोषवाक्य नसून, तो प्रत्येक प्रामाणिक भारतीयाचा राष्ट्रीय संकल्प आहे. जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई जिंकता येणार नाही. त्यामुळे देशातील युवक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्यांनी पुढे येऊन या राष्ट्रीय जनआंदोलनात सहभागी व्हावे. प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि उत्तरदायी बनवणे हेच आमचे ध्येय आहे. ते पुढे म्हणाले की, देशातील प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात सजग नागरिकांचे एक सक्षम जाळे तयार केले जाईल. जनतेच्या प्रत्येक न्याय्य आवाजाला ताकद देऊन कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देण्यासाठी ही चळवळ कटिबद्ध असेल.

COMMENTS