Homeताज्या बातम्या

रबरी गतिरोधक ठरताहेत अपघाताला निमंत्रण! उघडे लोखंडी खिळे वाहनचालकांसाठी जीवघेणे; निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाईची मागणी

बीड: रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील गावचौक, शाळांसमोरील परिसर तसेच वर्दळीच्या ठिकाणी रबरी गतिरोधक बसविण्यात

आचारसंहिता कालावधीतही बॅनरबाजीचा सुळसुळाट! डॉ. गणेश ढवळे यांच्या तक्रारीची दखल;  मुख्याधिकार्‍यांना केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश :- डॉ.गणेश ढवळे
राजमाता जिजाऊंना पुण्यतिथी निमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात विनम्र अभिवादन
लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; गुन्हे मागे घेण्याची मागणी

बीड: रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील गावचौक, शाळांसमोरील परिसर तसेच वर्दळीच्या ठिकाणी रबरी गतिरोधक बसविण्यात येतात. मात्र, अनेक ठिकाणी बसविण्यात आलेले हे गतिरोधक निकृष्ट दर्जाचे असल्याने अवघ्या काही दिवसांत तुटत असून, त्यातील लोखंडी खिळे आणि बोल्ट उघडे पडल्याने वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या मागणीनंतर जिल्हा सुरक्षा समितीच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रबरी गतिरोधक बसविण्यात येतात. परंतु, निकृष्ट साहित्यामुळे हे गतिरोधक आठवडाभरातच खराब होत आहेत. तुटलेल्या गतिरोधकांमधील धारदार खिळ्यांमुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, दुचाकी घसरून अपघात होणे आणि रात्रीच्या वेळी खिळे न दिसल्याने गंभीर दुखापती होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या धोकादायक परिस्थितीमुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने सर्व तुटलेल्या गतिरोधकांवरील उघडे लोखंडी खिळे काढून टाकावेत, खराब झालेल्या रबरी गतिरोधकांची दुरुस्ती करावी किंवा त्याऐवजी दर्जेदार नवीन गतिरोधक बसवावेत, तसेच निकृष्ट साहित्य वापरणार्‍या संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा सुरक्षा समिती आणि वाहतूक शाखेचे अधिकारी वैभव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रमुख मागण्या तुटलेल्या रबरी गतिरोधकांवरील उघडे लोखंडी खिळे तात्काळ काढावेत., खराब गतिरोधकांची दुरुस्ती करून दर्जेदार नवीन गतिरोधक बसवावेत., निकृष्ट साहित्य वापरणार्‍या ठेकेदारांची चौकशी करून कठोर कारवाई करावी. अपघाताचा वाढता धोका उघड्या खिळ्यांमुळे वाहनांचे टायर पंक्चर होत आहेत., दुचाकी घसरून अपघात आणि गंभीर दुखापतींच्या घटना वाढल्या आहेत., रात्रीच्या वेळी खिळे न दिसल्याने धोका अधिक वाढत आहे.

COMMENTS