Homeताज्या बातम्या

सौ. के.एस.के. महाविद्यालयात विद्यार्थी संवाद व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न

बीड: येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजी

कर्जतला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठीच्या हालचालींना वेग; ऍड. शेवाळे यांची माहिती
आ.भीमराव केराम यांचे नीलकंठ कातले व प्रकाश कुडमते हेच अधिकृत स्वीय सहाय्यक; अनधिकृत दाव्यांमुळे होणारा संभ्रम टाळण्याचे आवाहन
एफडीएची थेट बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड; प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मचा परवानाही निलंबित! तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई
Sau. K.S.K. (Kaku) College of Food Technology, Beed - Info, Admission,  Courses, Fees @ College360.co.in

बीड: येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्यायन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र कोर्स वितरण व संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक प्रो. डॉ. अश्विन रांजणीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबतच व्यवसायभिमुख शिक्षण घेऊन नोकरी व स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयात अनेक व्यवसायभिमुख प्रमाणपत्र कोर्स सुरू असून त्यातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याप्रसंगी सौंदर्य प्रसाधन व व्यक्तिमत्त्व विकास, ग्रामीण पत्रकारिता, बालवाडी-अंगणवाडी, विक्री प्रतिनिधी, दुग्ध व्यवसाय, ग्रंथालय व्यवस्थापन आणि सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध प्रमाणपत्र कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक पदवी शिक्षणासोबत या प्रमाणपत्र कोर्सेसला प्रवेश घ्यावा, असे आवाहन त्यांनी १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस., कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. राहुल सोनवणे यांनी केले, तर आभार डॉ. राऊत एस. आर. यांनी मानले.

COMMENTS