Homeताज्या बातम्या

माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन; शेतकर्‍यांना विषमुक्त व शाश्वत शेतीचे प्रत्यक्ष धडे

केज: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन

घुले हत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा; आम्ही तपासाला सहकार्य करू; खा. बजरंग सोनवणेंनी मांडली भूमिका, मुलाचे नाव जाणीवपूर्वक ओढल्याचा आरोप
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल; ८३ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण, ६२४ विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी
वाळूतस्करांवर कारवाई होते, मग ४२ कोटींच्या बोगस वृक्षलागवडीची चौकशी का नाही? डॉ. गणेश ढवळेंचा आ. विजय सिंह पंडितांना सवाल

केज: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत माळेगाव येथे नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. शेतकर्‍यांना विषमुक्त, पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीकडे वळविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

नैसर्गिक शेती शाळेचा मुख्य उद्देश शेतकर्‍यांना रासायनिक खत व कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करून उत्पादन खर्चात बचत करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविणे, हिरवळीच्या खतांचा वापर, पिकांची फेरपालट आणि जमिनीची सुपीकता वाढविणे हा आहे. या शाळेमध्ये शेतकर्‍यांना प्रत्यक्ष शेतावर प्रशिक्षण देण्यात येत असून नैसर्गिक शेतीतील विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली जात आहे. कार्यक्रमात जीवामृत, घनामृत, बीजामृत, निमास्त्र, दशपर्णी अर्क, निबोळी अर्क यांसारख्या जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर याबाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच जैविक निविष्ठांचा वापर करून बीजप्रक्रिया करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्या संकल्पनेतून आणि प्रकल्प उपसंचालक सूरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यात विविध खरीप पिकांसाठी नैसर्गिक शेती शाळा आयोजित करण्यात येत आहेत. तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या नियोजनातून माळेगाव येथे सोयाबीन पिकावरील नैसर्गिक शेती शाळा घेण्यात आली. या शेती शाळेसाठी २५ शेतकर्‍यांची निवड करण्यात आली असून सहभागी शेतकर्‍यांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत पीक प्रात्यक्षिकासाठी सोयाबीन बियाणे, बीजप्रक्रिया संच तसेच बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे.

यावेळी सोयाबीन बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची प्रति किलो बियाण्यास ४ ते ५ ग्रॅम प्रमाणात बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच महाजैविक रायझोबियम, पीएसबी आणि केएमबी या तीन घटकांचा समावेश असलेल्या जैविक जिवाणू संघाचा १० किलो बियाण्यास १०० मिली प्रमाणात वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमास आत्माचे योगेश पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी कमलाकर राऊत तसेच कालिदास गव्हाणे, यशवंत दोडके, शरद दोडके, बालाजी गव्हाणे, आशामती लोकरे, ज्योती लोकरे, गोविंद दोडके, बळीराम लोकरे, दीपक दोडके आणि कृषिभूषण शेतकरी गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS