Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मियामी ओपनमध्ये यानिक सिनरने पटकावले अजिंक्यपद

मियामी : इटलीच्या यानिक सिनर याने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत दमदार खेळ करत अजिंक्यपद पटकावले. पावसामुळे खंडित झालेल्या अंतिम सामन्यात त्याने चे

मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार ?
प्रचार फेरीच्या माध्यमातून राजवर्धन पाटील यांचा मतदारांशी संवाद
खा.विखे यांच्या माध्यमातून शहराचा अनुशेष भरून काढू -: माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

मियामी : इटलीच्या यानिक सिनर याने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत दमदार खेळ करत अजिंक्यपद पटकावले. पावसामुळे खंडित झालेल्या अंतिम सामन्यात त्याने चेक प्रजासत्ताकच्या जिरी लेहेका याचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह सिनरने एकही सेट न गमावता प्रतिष्ठेचा ‘सनशाईन डबल’ पूर्ण करत नवा इतिहास रचला.
जागतिक क्रमवारीत अव्वल गटात असलेल्या सिनरने संपूर्ण सामन्यात आपले वर्चस्व ठाम ठेवले. पहिल्या सर्व्हिसवर तब्बल 92 टक्के गुण जिंकत त्याने प्रतिस्पर्ध्याला संधीच दिली नाही. विशेष म्हणजे, त्याच्याविरुद्ध निर्माण झालेल्या तिन्ही ब्रेक गुणांचे त्याने अचूक बचाव करत आपली पकड अधिक मजबूत केली. मास्टर्स दर्जाच्या स्पर्धांमध्ये एकही सेट न गमावता सलग 17 विजयांची त्याची मालिका कायम राहिली. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना सिनर म्हणाला की, या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेली मेहनत आज फळाला आली असून हा विजय विशेष समाधान देणारा आहे. ‘सनशाईन डबल’ मिळवणे ही आपल्या कारकिर्दीतील अविस्मरणीय कामगिरी असल्याची भावना त्याने व्यक्त केली. पावसामुळे अंतिम सामना सुमारे दीड तास उशिरा सुरू झाला. तरीही सिनरने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत पहिल्या सेटमध्ये 3-1 अशी आघाडी घेतली आणि ती कायम राखत सेट जिंकला. दुसर्‍या सेटमध्येही पावसामुळे व्यत्यय आला; मात्र खेळ पुन्हा सुरू झाल्यावर सिनरने संयम राखत नियंत्रण राखले. पहिल्यांदाच मास्टर्स दर्जाच्या अंतिम सामन्यात उतरणार्‍या लेहेकाने दुसर्‍या सेटमध्ये जोरदार प्रतिकार केला. काही महत्त्वाचे ब्रेक गुण वाचवत त्याने एका टप्प्यावर 4-3 अशी आघाडीही घेतली होती. परंतु निर्णायक क्षणी सिनरने आपली गुणवत्ता दाखवत पुनरागमन केले. सहाव्या ब्रेकच्या संधीचा फायदा घेत 5-4 अशी आघाडी घेतल्यानंतर त्याने आपल्या सर्व्हिसवर सामना जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी 2017 मध्ये रॉजर फेडरर याने इंडियन वेल्स आणि मियामी या सलग स्पर्धा जिंकत ‘सनशाईन डबल’ साध्य केला होता. त्यानंतर ही कामगिरी करणारा सिनर हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या यशामुळे तो नोव्हाक जोकोविच, आंद्रे आगासी, पीट सॅम्प्रास, मायकल चँग आणि जिम कुरिअर यांसारख्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला आहे.

COMMENTS