Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्तेसाठी दबावतंत्र, राजकीय सूड : नगराध्यक्ष घुले ; गटनेते बदलावरून वाद चिघळला; कर्जत नगरपंचायतीत सत्तासंघर्ष तीव्र

कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील सत्तासंघर्षाने आता उग्र रूप धारण केले असून, हा वाद केवळ गटनेता बदलापुरता मर्यादित न राहता थेट सत्तेच्या अस्तित्वाची लढाई बनला आहे. “सभापती पदाची प्रतिष्ठा पणाला लावून सत्तांतर घडवण्याचा डाव रचला जात आहे,” असा घणाघाती आरोप गटनेते संतोष मेहत्रे यांनी करताच राजकीय वातावरण तापले आहे. नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या १५ पैकी ११ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सत्तेचे गणित एका रात्रीत बदलले. या घडामोडींमुळे आमदार रोहित पवार यांच्या प्रभावाखालील सत्ताकेंद्र डळमळीत झाले. नव्या सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांसाठी मोठ्या निधीची आश्वासने देण्यात आली होती. सभापती राम शिंदे यांनी प्रभागनिहाय विकासकामांचा धडाका लावण्याची ग्वाही दिली होती; मात्र सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे त्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “मी भाजपाचीच नगराध्यक्षा, मग हा घाट कशासाठी?” नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट सवाल उपस्थित करत म्हटले, “मी सुरुवातीपासून भाजपाचीच नगराध्यक्षा आहे. सभापती राम शिंदे यांनीच मला संधी दिली. मग भाजपाच्याच नगराध्यक्षेला हटवण्यासाठी सभापती पदाचा वापर का केला जात आहे?” त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरच संशयाचे सावट निर्माण झाले आहे.  “रोहित पवार आणि माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांची जिरविली, आता आमची पाळी?” असा सवाल उपस्थित करत घुले यांनी आरोप केला की, “त्याच पद्धतीने आमची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार सभापती पदाच्या मर्यादांना हरताळ फासणारा आहे.”   गटनेता व उपगटनेता निवड ही बहुमताच्या जोरावर आणि नियमानुसार झाल्याचा दावा संबंधित नगरसेवकांनी केला आहे. मात्र केवळ राजकीय अहंकारातून या प्रक्रियेत फूट पाडली जात असल्याचा आरोप होत असून, यामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुनावणीदरम्यान दबावाचे आरोप; खळबळजनक दावा जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीदरम्यान गंभीर आरोप समोर आले आहेत. गटनेते संतोष मेहत्रे यांचे वकील बाजू मांडत असतानाच, शेजारील शासकीय विश्रामगृहातून एका उच्च पदावरील व्यक्तीकडून दबाव टाकला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. “सुनावणी सुरू असतानाच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून आदेश वाकवण्याचा प्रयत्न झाला,” असा आरोप नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी केला असून, यामुळे प्रशासकीय प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. राजकारणाला नवी कलाटणी; पवार–शिंदे एकत्र? राजकीय वर्तुळात सध्या एक नवी चर्चा रंगू लागली आहे. ज्या आमदार रोहित पवार यांना लक्ष्य करत सत्ताबदल घडवून आणला गेला, त्याच प्रक्रियेत आता सभापती राम शिंदे आणि रोहित पवार हे तालुका पातळीवरील काही नेत्यांविरोधात एकत्र आल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्तासमीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चिंचोली गुरवमध्ये सिमेंट पाईप टाकण्यास प्रारंभ; पाण्याची समस्या सुटणार; थोरात कारखान्याच्या पुढाकाराने कार्यारंभ
अ‍ॅड. संदीप वर्पे यांची रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलवर वर्णी
शेवगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा; ‘वंचित’ व समविचारी पक्षांकडून ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे वाचन

कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील सत्तासंघर्षाने आता उग्र रूप धारण केले असून, हा वाद केवळ गटनेता बदलापुरता मर्यादित न राहता थेट सत्तेच्या अस्तित्वाची लढाई बनला आहे. “सभापती पदाची प्रतिष्ठा पणाला लावून सत्तांतर घडवण्याचा डाव रचला जात आहे,” असा घणाघाती आरोप गटनेते संतोष मेहत्रे यांनी करताच राजकीय वातावरण तापले आहे.

नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या १५ पैकी ११ नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर सत्तेचे गणित एका रात्रीत बदलले. या घडामोडींमुळे आमदार रोहित पवार यांच्या प्रभावाखालील सत्ताकेंद्र डळमळीत झाले. नव्या सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांसाठी मोठ्या निधीची आश्वासने देण्यात आली होती. सभापती राम शिंदे यांनी प्रभागनिहाय विकासकामांचा धडाका लावण्याची ग्वाही दिली होती; मात्र सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे त्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“मी भाजपाचीच नगराध्यक्षा, मग हा घाट कशासाठी?” नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट सवाल उपस्थित करत म्हटले, “मी सुरुवातीपासून भाजपाचीच नगराध्यक्षा आहे. सभापती राम शिंदे यांनीच मला संधी दिली. मग भाजपाच्याच नगराध्यक्षेला हटवण्यासाठी सभापती पदाचा वापर का केला जात आहे?” त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरच संशयाचे सावट निर्माण झाले आहे.

 “रोहित पवार आणि माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांची जिरविली, आता आमची पाळी?” असा सवाल उपस्थित करत घुले यांनी आरोप केला की, “त्याच पद्धतीने आमची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार सभापती पदाच्या मर्यादांना हरताळ फासणारा आहे.”

  गटनेता व उपगटनेता निवड ही बहुमताच्या जोरावर आणि नियमानुसार झाल्याचा दावा संबंधित नगरसेवकांनी केला आहे. मात्र केवळ राजकीय अहंकारातून या प्रक्रियेत फूट पाडली जात असल्याचा आरोप होत असून, यामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुनावणीदरम्यान दबावाचे आरोप; खळबळजनक दावा

जिल्हाधिकारी कार्यालयातील सुनावणीदरम्यान गंभीर आरोप समोर आले आहेत. गटनेते संतोष मेहत्रे यांचे वकील बाजू मांडत असतानाच, शेजारील शासकीय विश्रामगृहातून एका उच्च पदावरील व्यक्तीकडून दबाव टाकला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. “सुनावणी सुरू असतानाच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून आदेश वाकवण्याचा प्रयत्न झाला,” असा आरोप नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी केला असून, यामुळे प्रशासकीय प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राजकारणाला नवी कलाटणी; पवार–शिंदे एकत्र?

राजकीय वर्तुळात सध्या एक नवी चर्चा रंगू लागली आहे. ज्या आमदार रोहित पवार यांना लक्ष्य करत सत्ताबदल घडवून आणला गेला, त्याच प्रक्रियेत आता सभापती राम शिंदे आणि रोहित पवार हे तालुका पातळीवरील काही नेत्यांविरोधात एकत्र आल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे कर्जत नगरपंचायतीतील सत्तासमीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS