Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. तोडमल 

देवळाली प्रवरा  : राहुरी तालुका वकील संघाच्या सन 2026-2027 या वर्षासाठीच्या निवडणुका नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या निवडणुकीत अध्यक्षपदी ऍड. डी. आर. तोडमल यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी उपाध्यक्षपदी ऍड. प्रकाश मारुती संसारे, महिला उपाध्यक्षपदी ऍड. जयश्री दत्तात्रय घावटे यांची निवड झाली. सचिवपदी ऍड.  शशीकांत गजानन देशमुख यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. सहसचिवपदी ऍड. राहुल दिवे, खजिनदारपदी ऍड. असीफ शेख, तर सहखजिनदारपदी ऍड. दीपक  सगळगिळे यांची निवड झाली. सदस्य म्हणून ऍड. विशाल फिलीफ संसारे, ऍड. मनोज दत्तात्रय पारखे, ऍड. नवेद एकबाल बागवान, ऍड. सुरेखा विजय कुलकर्णी, ऍड. विद्या बाळकृष्ण अनाप आणि ऍड. अनिता बाळासाहेब तोडमल यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ सदस्य ऍड.  बी. बी. उऱ्हे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ऍड. पागिरे यांनी सहकार्य केले. निवड प्रक्रियेदरम्यान संघाचे ज्येष्ठ व कनिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे ज्येष्ठ सदस्यांसह सर्व वकिलांनी अभिनंदन केले. सत्कार प्रसंगी बोलताना अध्यक्ष ऍड. डी. आर. तोडमल यांनी राहुरी येथे जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करणे, नवीन इमारत उभारणी तसेच वकिलांच्या विविध प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ज्येष्ठ सदस्य ऍड. आर. जे. म्हसे, ऍड. आर. एम. उंडे, माजी अध्यक्ष ऍड. मोरे, ऍड. नवले, ऍड. आघाव, ऍड. पवार, ऍड. देशमुख, ऍड. भिंगारदे, ऍड. रसाळ आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

शेवगाव तहसील कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य; कर्मचाऱ्यांवर ठपका, नागरिकांचा तीव्र संताप
रायतळेत हायमास्ट सोलर पोलची तातडीने उभारणीचोरीच्या घटनेनंतर आ. दाते यांची त्वरित दखल
समता इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या परीक्षेत यश 

देवळाली प्रवरा  : राहुरी तालुका वकील संघाच्या सन 2026-2027 या वर्षासाठीच्या निवडणुका नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या निवडणुकीत अध्यक्षपदी ऍड. डी. आर. तोडमल यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी उपाध्यक्षपदी ऍड. प्रकाश मारुती संसारे, महिला उपाध्यक्षपदी ऍड. जयश्री दत्तात्रय घावटे यांची निवड झाली. सचिवपदी ऍड.  शशीकांत गजानन देशमुख यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. सहसचिवपदी ऍड. राहुल दिवे, खजिनदारपदी ऍड. असीफ शेख, तर सहखजिनदारपदी ऍड. दीपक  सगळगिळे यांची निवड झाली.

सदस्य म्हणून ऍड. विशाल फिलीफ संसारे, ऍड. मनोज दत्तात्रय पारखे, ऍड. नवेद एकबाल बागवान, ऍड. सुरेखा विजय कुलकर्णी, ऍड. विद्या बाळकृष्ण अनाप आणि ऍड. अनिता बाळासाहेब तोडमल यांची निवड करण्यात आली.

या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ सदस्य ऍड.  बी. बी. उऱ्हे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ऍड. पागिरे यांनी सहकार्य केले. निवड प्रक्रियेदरम्यान संघाचे ज्येष्ठ व कनिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नूतन पदाधिकाऱ्यांचे ज्येष्ठ सदस्यांसह सर्व वकिलांनी अभिनंदन केले. सत्कार प्रसंगी बोलताना अध्यक्ष ऍड. डी. आर. तोडमल यांनी राहुरी येथे जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करणे, नवीन इमारत उभारणी तसेच वकिलांच्या विविध प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ज्येष्ठ सदस्य ऍड. आर. जे. म्हसे, ऍड. आर. एम. उंडे, माजी अध्यक्ष ऍड. मोरे, ऍड. नवले, ऍड. आघाव, ऍड. पवार, ऍड. देशमुख, ऍड. भिंगारदे, ऍड. रसाळ आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS