Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन 

कर्जत : तालुक्यातील विविध प्रश्नांच्या बाबत युवा सेनेच्या वतीने सोमनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित “गोदा ते नर्मदा” जलयात्रेच्या शुभारंभ सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चोंडी येथे आगमन झाले असता त्यांचे उत्स्फूर्त व भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी युवा सेना तालुका प्रमुख कर्जत सोमनाथ शिंदे पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान करून त्यांचे स्वागत केले. सोमनाथ शिंदे पाटील यांची ओळख एकनाथ शिंदे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून परिसरात आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी जलयात्रेच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील हे देखील प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. “गोदा ते नर्मदा” जलयात्रेचा शुभारंभ अत्यंत भव्य आणि दिव्य वातावरणात करण्यात आला. या यात्रेमुळे नदीसंवर्धन, धार्मिक परंपरा आणि समाजजागृती यांना चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व भाविक या कार्यक्रमास उपस्थित होते. दरम्यान, कर्जत तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत युवा सेनेच्या वतीने सोमनाथ शिंदे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले. यामध्ये पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, शासकीय सुविधा आणि स्थानिक विकासकामे यांसंदर्भातील मागण्यांचा समावेश होता. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चिंचोली गुरवमध्ये सिमेंट पाईप टाकण्यास प्रारंभ; पाण्याची समस्या सुटणार; थोरात कारखान्याच्या पुढाकाराने कार्यारंभ
संगमनेरमध्ये जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद; आ.सत्यजित तांबे यांच्याकडून विविध प्रश्नांची तात्काळ सोडवणूक
सामनगावच्या सरपंच-उपसरपंचांविरोधातील ‘अविश्वास’ मंजूर

कर्जत : तालुक्यातील विविध प्रश्नांच्या बाबत युवा सेनेच्या वतीने सोमनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित “गोदा ते नर्मदा” जलयात्रेच्या शुभारंभ सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चोंडी येथे आगमन झाले असता त्यांचे उत्स्फूर्त व भव्य स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी युवा सेना तालुका प्रमुख कर्जत सोमनाथ शिंदे पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान करून त्यांचे स्वागत केले. सोमनाथ शिंदे पाटील यांची ओळख एकनाथ शिंदे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून परिसरात आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी जलयात्रेच्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश दिला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील हे देखील प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले.

“गोदा ते नर्मदा” जलयात्रेचा शुभारंभ अत्यंत भव्य आणि दिव्य वातावरणात करण्यात आला. या यात्रेमुळे नदीसंवर्धन, धार्मिक परंपरा आणि समाजजागृती यांना चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व भाविक या कार्यक्रमास उपस्थित होते.

दरम्यान, कर्जत तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत युवा सेनेच्या वतीने सोमनाथ शिंदे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले. यामध्ये पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, शासकीय सुविधा आणि स्थानिक विकासकामे यांसंदर्भातील मागण्यांचा समावेश होता. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS