Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे : भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळ

सौ.के.ए.के. महाविद्यालयात मेंदी प्रशिक्षण शिबीर संपन्न
अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करा-सुरेश हात्ते
सीआरपीएफ जवानाने झाडली स्वत:वर गोळी | LOKNews24

पुणे : भाजपचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते 59 वर्षांचे होते. ते मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे.

याआधी कसबा पेठ मतदारसंघातील भाजपच्या आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर रोजी निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसात भाजपला हा दुसरा धक्का बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण जगताप हे कर्करोगाशी झुंज देत होते. त्यामुळे ते अंथरुणला खिळून होते. परिणामी लक्ष्मण जगताप हे राजकीय जीवनात सक्रिय नव्हते. मध्यंतरी अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. तरीही महाराष्ट्राच्या सत्तांतरापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीवेळी जगताप हे पुण्यातून रुग्णावाहिकेतून मुंबईला गेले होते. त्यानंतर जगताप यांना मतदानासाठी व्हिलचेअरवरून आत नेण्यात आले होते. त्यांनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीचे अनेकांनी कौतुक केले होते. ते पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्षही होते.

COMMENTS